‘क्रू’ चित्रपटाचा येणार सीक्वेल

‘क्रू’ चित्रपटाचा येणार सीक्वेल

करिना कपूर, तब्बू, क्रीतिचा चित्रपट
करिना कपूर ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. वीरे दी वेडिंगनंतर करिनाचा चित्रपट ‘क्रू’ 29 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत तब्बू आणि क्रीति सेनॉनने मुख्य भूमिका साकारली होती. क्रू या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळविले होते. आता करिना कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’नंतर निर्माते तिच्या कारकीर्दीतील यशस्वी चित्रपटांपैकी एकाचा सीक्वेल घेऊन येत आहेत.
मागील वर्षी वीरे दी वेडिंगच्या सीक्वेलची घोषणा करण्यात आली होती. निर्माती रिया कपूरने आता अलिकडेच प्रदर्शित क्रू या चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा केली आहे. पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केल्यावर माझ्या लेखकांनी मेसेज पाठवत आपल्याकडे सीक्वेलची कल्पना असल्याचे कळविले होते. मला चित्रपट निर्माण करताना मोठा आनंद झाला होता. या चित्रपटाचा सीक्वेल अत्यंत मजेशीर असेल, कारण याची कहाणी कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचली नव्हती असे रिया कपूरने म्हटले आहे.
करिना-तब्बू आणि क्रीति सेनॉनच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 100 कोटी रुपयांचा आकडा चित्रपटाने ओलांडला होता. क्रू चित्रपटात तिन्ही अभिनेत्रींसोबत दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.