मजगाव हद्दीतील रेल्वेगेट पंधरा दिवसांपासून नादुरुस्त

मजगाव : मजगाव हद्दीतील रेल्वेगेट गेले पंधरा दिवसापासून नादुरुस्त अवस्थेत आहे. या गेटवरून शेकडो वाहने ये-जा करतात. पण रेल्वे खात्याच्या दिरंगाईमुळे अद्याप ते गेट नेहमी बंद अवस्थेत असते. एखादे वाहन आले की, गेटमन व नागरिकांच्या मदतीने गेट उचलून रस्ता पार करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधीत रेल्वे […]

मजगाव हद्दीतील रेल्वेगेट पंधरा दिवसांपासून नादुरुस्त

मजगाव : मजगाव हद्दीतील रेल्वेगेट गेले पंधरा दिवसापासून नादुरुस्त अवस्थेत आहे. या गेटवरून शेकडो वाहने ये-जा करतात. पण रेल्वे खात्याच्या दिरंगाईमुळे अद्याप ते गेट नेहमी बंद अवस्थेत असते. एखादे वाहन आले की, गेटमन व नागरिकांच्या मदतीने गेट उचलून रस्ता पार करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधीत रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्वरित रेल्वेगेट दुरुस्त करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या मच्छे-हालगा बायपास रस्त्यासाठी मोठमोठ्या टिप्पर्स व ट्रॅक्स अवजड साहित्य घेवून वाहतूक करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडीही होत आहे.