मंगळवार पेठ टिळकवाडी येथील उद्यानाची संरक्षक भिंत धोकादायक

दुर्घटना घडण्यापूर्वी महानगरपालिकेने तातडीने दुरुस्ती करण्याची गरज  बेळगाव : लहान मुले, वृद्ध फिरण्यासाठी उद्यानाचा आधार घेत असतात.पालक आपल्या पाल्यांना मनोरंजनासाठी किंवा बागडण्यासाठी उद्यानामध्ये घेऊन जात असतात. मात्र याच उद्यानांची अवस्था गंभीर बनली आहे. संरक्षक भिंत कधी कोसळेल याचा नेम नाही. मंगळवार पेठ येथील उद्यानाची संरक्षक भिंत कोसळली असून धोकादायक बनली आहे. तेव्हा महानगरपालिकेने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत […]

मंगळवार पेठ टिळकवाडी येथील उद्यानाची संरक्षक भिंत धोकादायक

दुर्घटना घडण्यापूर्वी महानगरपालिकेने तातडीने दुरुस्ती करण्याची गरज 
बेळगाव : लहान मुले, वृद्ध फिरण्यासाठी उद्यानाचा आधार घेत असतात.पालक आपल्या पाल्यांना मनोरंजनासाठी किंवा बागडण्यासाठी उद्यानामध्ये घेऊन जात असतात. मात्र याच उद्यानांची अवस्था गंभीर बनली आहे. संरक्षक भिंत कधी कोसळेल याचा नेम नाही. मंगळवार पेठ येथील उद्यानाची संरक्षक भिंत कोसळली असून धोकादायक बनली आहे. तेव्हा महानगरपालिकेने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. शहरामध्ये अनेक उद्याने असून त्यांच्या देखभालीचे काम महानगरपालिकेकडे आहे. दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र अनेक उद्यानांची सध्याची अवस्था पाहता खर्च केलेला निधी वाया जात असल्याचे दिसून येत आहे. उद्यानांना संरक्षक भिंत बांधण्यात आल्या आहेत. मात्र त्या भिंती जीर्ण झाल्या आहेत. मंगळवार पेठ येथील सायन्स पार्क म्हणूनही या उद्यानाकडे पाहिले जाते. मात्र या उद्यानाची भिंत धोकादायक बनली आहे. तेव्हा महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.