सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करा

सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करा

आर. के. पाटील यांचे प्रतिपादन : तालुका म. ए. समितीच्या वतीने बेळगुंदी-सोनोली गावात जनसंपर्क अभियान : कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वार्ताहर /किणये 
गेल्या 68 वर्षापासून सीमाप्रश्नाचा लढा लोकशाही मार्गाने सुरू आहे. हा खटला न्यायालयात आहे. सीमाभागातील सीमाबांधव 68 वर्षापासून महाराष्ट्रात जाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. या लढ्याला नक्कीच यश मिळणार. न्यायदेवता आपल्याला न्याय देणार. मात्र तोपर्यंत आपण रस्त्यावरची लढाई सुरू ठेवली पाहिजे. आणि सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मनोगत एपीएमसी माजी सदस्य आर. के. पाटील यांनी बेळगुंदी येथे व्यक्त केले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने तालुक्याच्या गावोगावी जाऊन गाव संपर्क अभियान उपक्रम राबविण्यात येत आहे. सोमवारी सायंकाळी बेळगुंदी-सोनोली भागात हा गाव संपर्क अभियान राबविण्यात आला. यावेळी बेळगुंदी येथे आर. के. पाटील बोलत होते.
बेळगुंदी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत माजी आमदार मनोहर किणेकर, समितीचे नेते आर. एम. चौगुले यांनी सीमाप्रश्नाची तऊणांना माहिती देऊन मार्गदर्शन केले. व सीमाप्रश्नाची लढाई पुन्हा एकदा नव्या जोशाने लढण्यासाठी आपण सर्वांनी मिळून कार्य करू, असे सांगितले. मोनापा पाटील, अनिल पाटील, मनोहर हुंदरे यांनीही कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी किरण मोटणकर, राजू किणेकर, माऊती शिंदे, जयवंत खाचू गावडे, रामा पाटील, शिवाजी पाऊसकर, प्रल्हाद शिंदे, हनुमंत नागिनठी, गोविंद पाटील, कृष्णा कननुरकर आदींसह गावातील असंख्य असे कार्यकर्ते उपस्थित होते. सोनोली गावातही म. ए.समितीचे नेतेमंडळी व गावातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच नवीन कार्यकर्त्यांची यादी तयार करण्यासंदर्भात चर्चा केली.
सीमाप्रश्नासाठी आपल्या वडीलधारी मंडळींनी तुऊंगवास भोगला आहे. लाठ्या खाल्लेल्या आहेत. काहीजण हुतात्मे झालेले आहेत. त्यांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही. सीमाप्रश्न सुटेपर्यंत आपण हा लढा सुरूच ठेवला पाहिजे, असे माजी आमदार मनोहर किणेकर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करताना सांगितले. यावेळी सुनील झंगरूचे, कुम्माना झंगरूचे, अनिल झंगरूचे, शिवाजी कडोलकर, हनुमंत पाटील, भरमु पाटील, संतोष पाटील, हरिभाऊ झंगरूचे, कृष्णा झंगरूचे, माऊती पाटील, बसवंत कडोलकर, भाऊराव कडोलकर, हेमानी हाजगोळकर आदींसह गावातील वडीलधारी मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.