कोनवाळ गल्ली येथील ‘त्या’ वासराची गोशाळेत रवानगी

कोनवाळ गल्ली येथील ‘त्या’ वासराची गोशाळेत रवानगी

बेळगाव : कोनवाळ गल्ली येथील महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयाजवळ अज्ञातानी गायीचे वासरु सोडले होते. पावसामध्ये ते भिजत असल्याने महानगरपालिकेला याची माहिती दिली. महानगरपालिकेच्या पथकाने त्या वासराला ताब्यात घेऊन श्रीनगर येथील गोशाळेत पाठविले. सध्या पावसाळा सुरू आहे. यातच ही बेवारस लहान वासरे रस्त्यावर कुडकुडत बसत आहेत. मंगळवारी महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयाजवळ असेच एक वासरु सोडून दिले होते. बराच उशीर कोणी आलेच नाही. मनपाच्या विभागीय कार्यालयातील गजानन कांबळे यांनी याची माहिती महानगरपालिकेच्या पथकाला दिली. त्यानंतर तातडीने राजू संकण्णावर तसेच इतर काही जणांनी त्या वासराला वाहनातून गोशाळेत पाठविले.