आधारकार्ड-रेशनकार्ड अपडेटसाठी गर्दी

सर्व्हरडाऊनचा फटका, लाभार्थी ताटकळत बेळगाव : रेशनकार्ड दुरुस्तीच्या कामाला चालना मिळाल्याने आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे अपडेट करण्यासाठी ऑनलाईन केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. शासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांची धडपड सुरू असल्याचे दिसत आहे. तहसीलदार कार्यालयातही नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. मागील चार दिवसांपासून रेशनकार्ड दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे आवश्यक आहेत. […]

आधारकार्ड-रेशनकार्ड अपडेटसाठी गर्दी

सर्व्हरडाऊनचा फटका, लाभार्थी ताटकळत
बेळगाव : रेशनकार्ड दुरुस्तीच्या कामाला चालना मिळाल्याने आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे अपडेट करण्यासाठी ऑनलाईन केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. शासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांची धडपड सुरू असल्याचे दिसत आहे. तहसीलदार कार्यालयातही नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. मागील चार दिवसांपासून रेशनकार्ड दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यामुळे आधारकार्ड दुरुस्तीला वेग आला आहे. रेशनकार्डमध्ये नाव जोडणे, मोबाईल नंबर, पत्ता आणि इतर दुरुस्तीसाठी आधारकार्ड आवश्यक आहे.
त्यामुळे प्रथम आधारकार्ड दुरुस्ती गरजेची आहे. एकूणच आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड आणि इतर शासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांची धावपळ होऊ लागली आहे. सरकारने मागील दोन वर्षांपासून नवीन रेशनकार्ड वितरण प्रक्रिया सुरळीत केली नाही. त्यामुळे अनेकांना रेशनकार्डपासून वंचित राहावे लागले आहे. निवडणुकीनंतर या कामाला चालना मिळेल, असे वाटत असतानाही निराशा झाली आहे. सध्या रेशनकार्ड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र त्यामध्येही सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण होत असल्याने काम संथगतीने सुरू आहे. दुसरीकडे मात्र आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर शासकीय कागदपत्रांच्या दुरुस्तीसाठी आणि अपडेटसाठी ऑनलाईन सेंटरवर नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे.