जगातील सर्वात महागडा रंग
सोन्या-चांदीपेक्षाही अधिक किंमत
देशात सध्या रंगोत्सवाची धूम सुरू आहे. प्रत्येकजण एखादा रंग-गुलालात न्हाऊन निघाला आहे. बाजारात याकरता अनेक प्रकारचे रंग उपलब्ध होतात. परंतु एक रंग असे आहे जो खरेदी करणे सर्वांनाच शक्य नाही. याची किंमत सोन्या-चांदीपेक्षाही अधिक आहे. हा रंग अत्यंत दुर्लभ असल्याने श्रीमंत लोक देखील तो खरेदी करण्यापूर्वी शंभरदा विचार करतील.
जगातील सर्वात महाग रंगद्रव्य हा लापीस लाजुली आहे. कलरमॅटर्सनुसार हा सुंदर निळा रंग अत्यंत दुर्लभ होता, यामुळे याची किंमत अनेकदा सोन्यापेक्षा अधिक असायची. आजही ओरिजिनल लापीस लाजुली सहजपणे मिळत नाही. प्राचीन काळात प्रसिद्ध चित्रका स्वत:च्या चित्रांसाठी या रंगाचा वापर करायचे. हा रंग इतका दुर्लभ होता की कलाकारांना शिपमेंट येण्यासाठी कित्येक महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती.
हा रंग लापीस लाजुलीला वाटून तयार केला जातो. लापीस लाजुली हा अफगाणिस्तानात आढळणारा एक रत्न आहे. दुर्लभतेमुळे याचा वापर अत्यंत कमी प्रमाणात केला जात होता. धार्मिक कलाकृती, देवतांचे चित्र तयार करण्यासाठी याचा वापर व्हायचा. याच्या निर्मितीकरता प्रथम रत्नांचे खनन व्हायचे. मग तो वाटण्याची प्रक्रिया अत्यंत अवघड असायची. याचमुळे याचा वापर हळूहळू कमी होऊ लागला. 1820 च्या दशकाच्या अखेरीस फ्रान्स आणि जर्मनीमध्ये सिंथेटिक अल्ट्रामरीनची निमिर्ती सुरू झाली, याला लापीस लाजुलीचा पर्याय मानले गेले.
लापीस लाजुली निळ्या रंगाचा दगड असून तो अफगाणिस्तानच्या पर्वतीय क्षेत्रात मिळविला जातो. प्राचीन भारतीय संस्कृतीत ज्या नवरत्नांना मान्यता देण्यात आहे, त्यात याचा समावेश होता. याला लाजवर्द किंवा राजावर्त नावाने ओळखले जायचे. केवळ एक ग्रॅम लापीस लाजुलीची किंमत 83 हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. शास्त्रांमध्ये या रत्नाचे अत्यंत अधिक महत्त्व आहे.
Home महत्वाची बातमी जगातील सर्वात महागडा रंग
जगातील सर्वात महागडा रंग
सोन्या-चांदीपेक्षाही अधिक किंमत देशात सध्या रंगोत्सवाची धूम सुरू आहे. प्रत्येकजण एखादा रंग-गुलालात न्हाऊन निघाला आहे. बाजारात याकरता अनेक प्रकारचे रंग उपलब्ध होतात. परंतु एक रंग असे आहे जो खरेदी करणे सर्वांनाच शक्य नाही. याची किंमत सोन्या-चांदीपेक्षाही अधिक आहे. हा रंग अत्यंत दुर्लभ असल्याने श्रीमंत लोक देखील तो खरेदी करण्यापूर्वी शंभरदा विचार करतील. जगातील सर्वात महाग […]