केदनुरात टाटा सुमो जळून खाक
अज्ञातांविरुद्ध काकती पोलिसात तक्रार
प्रतिनिधी/ बेळगाव
रस्त्याशेजारी उभी करण्यात आलेली टाटा सुमो पेटविण्यात आली आहे. केदनूर, ता. बेळगाव येथे ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गावातील पाच जणांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मारुती भागाण्णा राजाई (वय 54) यांनी फिर्याद दिली आहे. केए 49, 3588 क्रमांकाची टाटा सुमो गोल्ड त्यांनी आपल्या घराजवळच रस्त्याशेजारी उभी केली होती. सोमवार दि. 17 जून रोजी सकाळी स्मशान रोडवर उभी करण्यात आलेली सुमो अज्ञातांनी पेटवल्याची मारुती यांना माहिती मिळाली.
दि. 16 जूनच्या रात्री 8 ते 17 जूनच्या सकाळी 7 यावेळेत वाहन पेटविण्यात आले असून या घटनेत पाच लाखांचे नुकसान झाले आहे. केदनूर येथील पाच जणांविरुद्ध संशय व्यक्त करण्यात आला असून, काकतीचे पोलीस निरीक्षक उमेश एम. पुढील तपास करीत आहेत.
Home महत्वाची बातमी केदनुरात टाटा सुमो जळून खाक
केदनुरात टाटा सुमो जळून खाक
अज्ञातांविरुद्ध काकती पोलिसात तक्रार प्रतिनिधी/ बेळगाव रस्त्याशेजारी उभी करण्यात आलेली टाटा सुमो पेटविण्यात आली आहे. केदनूर, ता. बेळगाव येथे ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गावातील पाच जणांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. मारुती भागाण्णा राजाई (वय 54) यांनी फिर्याद दिली आहे. केए 49, 3588 क्रमांकाची टाटा सुमो गोल्ड […]