मिलिटरी फार्मनजीकचे धोकादायक बांबू हटविले

कॅन्टोन्मेंटची कारवाई, वाहनधारकांना दिलासा प्रतिनिधी/ बेळगाव बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर मिलिटरी फार्मनजीक असलेले धोकादायक बांबू शनिवारी हटविण्यात आले आहेत. कॅन्टोन्मेंटतर्फे ही कारवाई करण्यात आली आहे. या मार्गावर मागील काही दिवसांपासून हे बांबू धोकादायक स्थितीत होते. सुकून गेल्याने कधी कोसळतील याचा नेम नव्हता. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने याची दखल घेत रस्त्याशेजारी असलेले बांबू हटविले आहेत. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर दुतर्फा धोकादायक […]

मिलिटरी फार्मनजीकचे धोकादायक बांबू हटविले

कॅन्टोन्मेंटची कारवाई, वाहनधारकांना दिलासा
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर मिलिटरी फार्मनजीक असलेले धोकादायक बांबू शनिवारी हटविण्यात आले आहेत. कॅन्टोन्मेंटतर्फे ही कारवाई करण्यात आली आहे. या मार्गावर मागील काही दिवसांपासून हे बांबू धोकादायक स्थितीत होते. सुकून गेल्याने कधी कोसळतील याचा नेम नव्हता. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने याची दखल घेत रस्त्याशेजारी असलेले बांबू हटविले आहेत.
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर दुतर्फा धोकादायक झाडे आहेत. वादळी पावसात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या झाडांबरोबरच रस्त्याशेजारी सुकलेल्या अवस्थेत बांबू होते. धोकादायक बांबू रस्त्याच्या एका बाजूला कलंडले होते. त्यामुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला होता. दरम्यान कॅन्टोन्मेंट बोर्डाने अखेर हे बांबू हटविल्याने वाहन धारकांतून समाधान व्यक्त होत आहे.