बिस्किट किती महाग असू शकेल…

खाण्याच्या बिस्किटाची किंमत असून असून किती असू शकेल, हा प्रश्न आपल्याला हास्यास्पद वाटण्याची शक्यता आहे. कारण बाजारात 10 रुपयांना चांगल्या बिस्किटांचा एक पुडा मिळू शकतो. त्यामुळे बिस्किटाची किंमत हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही, असे बहुतेकांना वाटते. बिस्किट सोन्याचे असेल तर मात्र ते महाग असू शकते. पण त्याचा खाण्यासाठी उपयोग नसतो. तथापि, या जगात […]

बिस्किट किती महाग असू शकेल…

खाण्याच्या बिस्किटाची किंमत असून असून किती असू शकेल, हा प्रश्न आपल्याला हास्यास्पद वाटण्याची शक्यता आहे. कारण बाजारात 10 रुपयांना चांगल्या बिस्किटांचा एक पुडा मिळू शकतो. त्यामुळे बिस्किटाची किंमत हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही, असे बहुतेकांना वाटते. बिस्किट सोन्याचे असेल तर मात्र ते महाग असू शकते. पण त्याचा खाण्यासाठी उपयोग नसतो. तथापि, या जगात एक बिस्किट असे आहे, की जे खाण्याचेच आहे, पण त्याची किंमत इतकी अधिक आहे, की या किमतीत आपण एक महागडी कार विकत घेऊ शकाल.
या बिस्किटाचा 2015 मध्ये लिलाव करण्यात आला. या लिलावाद्वारे त्याची विक्री 15 हजार पौंडाना करण्यात आली. रुपयांमध्ये ही किंमत सध्याच्या दरानुसार 15 लाख इतकी आहे. ब्रिटनमध्ये हा लिलाव करण्यात आला. आता, या बिस्किटाची किंमत इतकी प्रचंड असण्याच कारण काय, हा प्रश्न सहाजिकच सर्वांना पडतो. तर त्याचे कारण असे आहे, की हे बिस्किट ‘टायटॅनिक’ या बुडालेल्या जगप्रसिद्ध प्रवासी नौकेवरचे आहे. त्या काळात जगातील सर्वात मोठी प्रवासी नौका मानली गेलेली टायटॅनिक ही 1912 मध्ये ब्रिटनहून अमेरिकेकडे जात असताना उत्तर सागरात हिमकड्यांना आदळून बुडाली. त्या नौकेतून प्रवास करणारी बहुतेक सर्व माणसेही प्राणांस मुकली. तथापि, हे एक बिस्किट जसेच्या तसे संशोधकांच्या हाती लागले. हे बिस्किट हा या नौकेवरचा एकच खाण्याचा पदार्थ जसाच्या तसा सापडला आहे. या बिस्किटाची नंतर कसून चाचणी करण्यात आली आणि ते टायटॅनिकवरचेच आहे, याची पडताळणी करण्यात आली. त्यामुळे या बिस्किटाची किंमत इतकी प्रचंड आहे. हा उलगडा पटण्यासारखा आहे.