मतदान करून लोकशाही बळकट करा
सीईओ राहुल शिंदे, स्वीप समितीतर्फे शहरात मतदान जागृती फेरी
बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा स्वीप समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंती आणि माजी देवदासी यांच्या सहकार्याने शहरामध्ये मतदान जागृती फेरी काढण्यात आली. चन्नम्मा चौकातून या जागृती फेरीला जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या हस्ते चालना देण्यात आली. यावेळी ते म्हणाले, प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. तृतीयपंतीयांनीही मतदानापासून दूर न राहता मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला अधिक बळक करावे. आपला नेता निवडण्यासाठी न चुकता मतदान करावे. शहरी भागामध्ये मतदानाचा टक्का घटत आहे. सुजाण नागरिकांनी मतदान करून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. चन्नम्मा चौकातून जागृती फेरीला प्रारंभ करुन डॉ. बी. आर. आंबेडकर उद्यान रस्ता, कृष्ण देवराय चौक, महानगरपालिका या मार्गे जागृती फेरी काढण्यात आली. यावेळी स्वीप समितीचे नोडल अधिकारी व जि. पं. योजना अधिकारी डॉ. एम. कृष्णराज, लेखाधिकारी गंगा हिरेमठ, मनपा आयुक्त पी. एन. लोकेश, महिला आणि बाल कल्याण खात्याचे उपसंचालक आर. नागराज, महिला विकास निगमच्या निरीक्षक रुपा पवार, क्रीडा खात्याचे उपसंचालक बी. श्रीनिवास आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी मतदान करून लोकशाही बळकट करा
मतदान करून लोकशाही बळकट करा
सीईओ राहुल शिंदे, स्वीप समितीतर्फे शहरात मतदान जागृती फेरी बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा स्वीप समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंती आणि माजी देवदासी यांच्या सहकार्याने शहरामध्ये मतदान जागृती फेरी काढण्यात आली. चन्नम्मा चौकातून या जागृती फेरीला जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या हस्ते चालना देण्यात आली. यावेळी ते म्हणाले, प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. […]