गोगटे सर्कल येथील ‘ते’धोकादायक वीजखांब हटविले

गोगटे सर्कल येथील ‘ते’धोकादायक वीजखांब हटविले

बेळगाव : गोगटे सर्कल येथे विद्युत खांब कोसळण्याच्या स्थितीत असल्याने धोकादायक ठरत होता. रेल्वेच्या जुन्या आरक्षण केंद्राशेजारीच हा धोकादायक विद्युत खांब असल्याने हटविण्याची मागणी केली जात होती. अखेर बुधवारी हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी हा विद्युत खांब हटवून परिसर मोकळा केला. रेल्वेचे जुने आरक्षण केंद्र गोगटे सर्कल येथे होते. या केंद्राला लागूनच दोन विद्युत खांब ट्रान्स्फॉर्मरसाठी जोडण्यात आले होते. याठिकाणचा ट्रान्स्फॉर्मर हलविल्यानंतर विद्युत खांब तसेच होते. यापैकी एक विद्युत खांब मोडून कलंडला होता. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घटन्यापूर्वी विद्युत खांब हटविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात होती. बुधवारी सकाळी व्रेनच्या साहाय्याने वापरात नसलेले विद्युत खांब हटविण्यात आले. गोगटे सर्कल येथे वाहनांची सतत ये-जा असल्याने विद्युत खांब हटविणे गरजेचे होते. परंतु काही वेळ वाहतूक थांबवून दोन्ही विद्युत खांब हटविण्यात आले. साहाय्यक कार्यकारी अभियंता सुखसारे व सेक्शन ऑफिसर यांसह इतर कर्मचाऱ्यांनी विद्युत खांब हटविला.