अजूनही लाखो वाहने एचएसआरपीपासून लांबच
सरकारी वाहनेही वंचित : 31 मेपर्यंत अंतिम मुदत : नागरिकांमध्ये जागृती करणे गरजेचे
बेळगाव : एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असतानाही वाहनचालक मात्र नंबरप्लेट बसविण्याबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे. केवळ नागरिकच नाही तर सरकारी वाहनांनाही अद्याप एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यात आलेल्या नाहीत. आतापर्यंत बेळगाव विभागामध्ये केवळ 29 हजार 167 वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे नंबरप्लेट बसविण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची सक्ती प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारकडून दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 मे पूर्वी एचएसआरपी नंबरप्लेट न बसविल्यास प्रादेशिक परिवहन तसेच रहदारी पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बेळगाव विभागात एचएसआरपी नंबरप्लेट नसलेली 5 लाख 32 हजार 378 वाहने आहेत. यापैकी 15 मार्चपर्यंत 29 हजार 167 वाहनांना नवीन नंबरप्लेट बसविण्यात आल्या. सक्ती करण्यात आली असली तरी नागरिकांमध्ये तितकीशी जागृती नसल्याने नंबरप्लेट बसविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामीण भागात तर याविषयीची पुसटशी कल्पना नसल्याने जुन्या वाहनांना अद्याप जुन्याच नंबरप्लेट आहेत. नंबरप्लेट बसविण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली असून ग्राहकांना वेबसाईटवर जाऊन नोंदणी व त्यासाठीचे शुल्क द्यावयाचे आहे. केवळ खासगी वाहनेच नाही तर सरकारी वाहनांनाही एचएसआरपी नंबरप्लेट सक्तीच्या करण्यात आल्या आहेत. परंतु, महसूल, अग्निशमन, शिक्षण, आरोग्य, केपीटीसीएल, हेस्कॉम यासह इतर सरकारी कार्यालयांच्या वाहनांनाही अद्याप एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यात आलेल्या नाहीत. यामुळे या वाहनांवर कोणती कारवाई करणार, हे पहावे लागणार आहे.
डिलर्सची संख्या मर्यादित
शहरी भागातील अनेक वाहनचालकांनी आतापर्यंत वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेतल्या आहेत. तर उर्वरित वाहनचालकांनी नंबरप्लेटसाठी बुकिंग केले आहे. परंतु, वाहनसंख्येच्या मानाने डिलर्सची संख्या मर्यादित असल्याने वाहनचालकांना 2 ते 3 महिन्यांच्या वेटिंगवर थांबावे लागत आहे. विशेषत: हिरो कंपनीच्या वाहनांची संख्या मोठी असतानाही शहरात एकच डिलर असल्याने प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
Home महत्वाची बातमी अजूनही लाखो वाहने एचएसआरपीपासून लांबच
अजूनही लाखो वाहने एचएसआरपीपासून लांबच
सरकारी वाहनेही वंचित : 31 मेपर्यंत अंतिम मुदत : नागरिकांमध्ये जागृती करणे गरजेचे बेळगाव : एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असतानाही वाहनचालक मात्र नंबरप्लेट बसविण्याबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे. केवळ नागरिकच नाही तर सरकारी वाहनांनाही अद्याप एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यात आलेल्या नाहीत. आतापर्यंत बेळगाव विभागामध्ये केवळ 29 हजार 167 वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट […]