शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश

शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश

शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समंती ने केले आहे. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले राजेंद्र गावित यांनी 2018 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी 2019 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीने जागा आणि उमेदवारी मागितली होती. त्यांना शिवसेनेत पाठवले होते. त्यांनी निवडणूक जिंकली होती. 

लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीत पालघरची जागा भाजपला मिळाली. गावित यांना या जागेवरून उमेदवारी दिली आहे. एकनाथ शिंदे यांना विनंती करून त्यांचा भाजपमध्ये समावेश करून घेतला आहे. राजेंद्र गावित दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात चांगल्याप्रकारे काम करू शकतात. त्यांनी महाराष्ट्रातच राहावे अशी आम्ही त्यांना विनंती केली होती. राजेंद्र गावित हे महाराष्ट्रात चांगले काम करतील असा विश्वास आहे.  त्यांना जुना मंत्री आणि आमदार म्हणून अनुभव आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यावर आम्ही पालघरचे उमेदवार बदलले असं फडणवीस म्हणाले. 

 

गावित म्हणाले मला भाजपने पुन्हा प्रवेश दिल्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. 2018 मध्ये मी भाजपमध्ये प्रवेश केला. चुरशीशी निवडणूक लढवली होती. नंतर पालघर जागेसाठी आग्रह धरला आणि शिवसेनेत गेलो. नन्तर मी एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहिलो आता फडणवीस यांनी आदिवासी विभागासाठी माझं काम आहे भाजप सोबत येण्याची त्यांनी मला विनंती केली आज माझी पुन्हा घरवापसी झाली असून शिंदे यांनी मदत केली आहे. 

 

Edited By- Priya Dixit 

 

Go to Source