बोगस मतदानाच्या आरोपावरून साखराळे गावात कार्यकर्त्यांमध्ये राडा….वातावरण तंग

बोगस मतदानाच्या आरोपावरून साखराळे गावात कार्यकर्त्यांमध्ये राडा….वातावरण तंग

हातकंनगले मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील- सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील बूथ क्रमाक 62, 63 वर हा प्रकार घडला.

पहा VIDEO >>>हातकणंगले मतदारसंघात मविआ आणि महायुतीच्या कार्यकर्त्यामध्य़े जोरदार राडा.. 
महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या दोन गटात जोरात बाचाबाची होऊन त्याचे पुनर्वसन हाणामारीत झाले. मतदान केंद्र क्रमांक 62 आणि 63 वर सत्यजित पाटील सरूडकर यांचे प्रतिनिधी बोगस मतदान करत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत धैर्यशील माने यांच्या गटाने मतदान केंद्र काही काळ बंद ठेवले होते.
यावरून सत्यजित पाटील सरूडकर गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन जाब विचारण्याकरीता आले असता दोन्ही गटात शाब्दिक वादावादी होऊन त्याचे पुनर्वसन जोरदार हाणामारी झाले. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांचा हस्तक्षेप झाल्यानंतर आता सध्या मतदान सुरळीत सुरू आहे. धैर्यशील माने गटाचे दत्तात्रेय पाटील यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांच्या बोगस प्रतिनिधीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.