शाळांना पाठ्यापुस्तकांची प्रतीक्षा

आजवर केवळ 32 टक्के पुस्तकांचा पुरवठा बेळगाव : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघे 15 दिवस शिल्लक राहिले असल्याने पाठ्यापुस्तकांची उपलब्धता करून देण्यामध्ये शिक्षण विभाग व्यस्त आहे. शहर विभागात अद्याप 32.21 टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे उर्वरित पुस्तकांची उपलब्धता केव्हा होणार, या प्रतीक्षेत शिक्षण विभाग आहे. पाठ्यापुस्तके मिळविण्यासाठी सरकारी शाळांच्या शिक्षकांची गोडावूनमध्ये गर्दी होत […]

शाळांना पाठ्यापुस्तकांची प्रतीक्षा

आजवर केवळ 32 टक्के पुस्तकांचा पुरवठा
बेळगाव : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघे 15 दिवस शिल्लक राहिले असल्याने पाठ्यापुस्तकांची उपलब्धता करून देण्यामध्ये शिक्षण विभाग व्यस्त आहे. शहर विभागात अद्याप 32.21 टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे उर्वरित पुस्तकांची उपलब्धता केव्हा होणार, या प्रतीक्षेत शिक्षण विभाग आहे. पाठ्यापुस्तके मिळविण्यासाठी सरकारी शाळांच्या शिक्षकांची गोडावूनमध्ये गर्दी होत आहे. 29 मे पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी प्रत्येक शाळेला पाठ्यापुस्तक उपलब्ध करून देण्यासाठीची तयारी सुरू आहे. सरकारी शाळांना राज्य सरकारकडून मोफत पाठ्यापुस्तके वितरित केली जातात. तर अनुदानित व खासगी शाळांना पाठ्यापुस्तकांसाठी शुल्क भरावे लागते. बेळगाव शहर विभागात सरदार्स हायस्कूल व चव्हाट गल्ली येथील मराठी शाळा क्र. 5 येथे पाठ्यापुस्तकांचे गोडावून करण्यात आले आहे. या ठिकाणाहून टप्प्याटप्प्याने पाठ्यापुस्तके शाळांना वितरित केली जात आहेत. बेळगाव शहर विभागात एकूण 10 लाख 47 हजार 467 पुस्तकांची मागणी आहे. त्यापैकी आतापर्यंत 3 लाख 37 हजार 413 पुस्तकांचा पुरवठा केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. सरकारीसह विनाअनुदानित व खासगी शाळांना लवकरच पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठीची तयारी सुरू आहे. बेंगळूर येथील छपाई झालेली पुस्तके बेळगावमध्ये पाठविली जात आहेत. काही इयत्तांच्या अभ्यासक्रमात बदल केल्याने शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ही पाठ्यापुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
पुस्तके टप्प्याटप्प्याने शिक्षकांकडे सुपूर्द
बेंगळूर येथून छपाई झालेली पुस्तके टप्प्याटप्प्याने बेळगावमध्ये येत आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळांना पुस्तके पाठविण्यासाठी तयारी सुरू आहे. पुरवठा झालेली पुस्तके टप्प्याटप्प्याने शाळेच्या शिक्षकांकडे सुपूर्द केली जात आहेत.
– आय. डी. हिरेमठ (समन्वय अधिकारी)