रोहन ट्रेडर्स बीएससी, पोतदार रॉयल्स संघांची विजयी सलामी

सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक  बेळगावत प्रथमच होणाऱ्या प्रकाश झोतातील बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेतील उद्घाटनाच्या सामन्यात रोहन ट्रेडर्स बीएससी व पोदार रॉयल्स सीसीआय यांनी शानदार विजय मिळवित विजयी सलामी दिली. सुजय सातेरी (बीएससी) व अंगदराज हितलमणी(पोतदार) याना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. युनियन […]

रोहन ट्रेडर्स बीएससी, पोतदार रॉयल्स संघांची विजयी सलामी

सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक  बेळगावत प्रथमच होणाऱ्या प्रकाश झोतातील बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेतील उद्घाटनाच्या सामन्यात रोहन ट्रेडर्स बीएससी व पोदार रॉयल्स सीसीआय यांनी शानदार विजय मिळवित विजयी सलामी दिली. सुजय सातेरी (बीएससी) व अंगदराज हितलमणी(पोतदार) याना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. युनियन जिमखाना मैदानावर स्पर्धा पुरस्कर्ते प्रमोद कदम यांच्या हस्ते यष्टी पूजन करण्यात आले यावेळी प्रसन्ना सुंठणकर, रोहन कदम, ऋतुराज भाटे आदी मान्यवर उपस्थित होते. पहिला सामन्यात रोहन ट्रेडर्स बीएससी संघाने भाटे वॉरियर्स संघाचा आठ गड्याने पराभव केला. भाटे वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 142 धावा केल्या.त्यात माझीद मकानदारने 3 षटकार 4 चौकारांसह 49, ऋतुराज भाटेने 5 चौकारांसह 33 धावा केल्या. रोहन ट्रेडर्स तर्फे कृष्णा बागडी,यश हावळाण्णाचे, अक्षय पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.    प्रत्युत्तरादाखल खेळताना रोहन ट्रेडर्स बीएससी संघाने 16.5 षटकात 2 गडीबाद 143 धावा करून सामना 8 गट्यांनी जिंकून  विजयाचे उद्दिष्ट गाठले. त्यात  रणजीपटू सुजय सातेरीने 2 षटकार व 5 चौकारांसह 61 तर रोहन कदमने 11 चौकारांसह 54 धावा केल्या. भाटे संघातर्फे माझीद मकानदार व वैष्णव संगमित्र यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
सायंकाळी प्रकाश झोतात झालेल्या दुसऱ्या सामन्यात पोतदार रॉयल्स सीसीआय संघाने इंडियन बॉइज सेंटर संघाचा 66 धावांनी पराभव केला. पोतदार रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडीबाद 122 धावा केल्या. त्यात आदर्श हिरेमठने 32, आकाश असलकरने 21 धावा केल्या. इंडियन बॉइज तर्फे सुधीर गवळी व विजय पाटील यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंडियन बॉईज इंडियन का संघाचा डाव 12.5 षटकात 56 धावात गारद झाला. त्यात तनिष्क नाईकने 13 धावा केल्या. पोदार ट्रॅव्हल्स तर्फे या सामन्यात अंगदराज हितलमनी याने विक्रमी कामगिरी करताना फक्त एका धावेत सहा गडी टिपण्याचा विक्रम केला.  आकाश असलकरने 2 गडीबाद करीत मोलाची साथ दिली. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे दीपक पवार, प्रसन्न सुंठनकर व संजय शास्त्राr यांच्या हस्ते सामनावीर सुजय सातेरी व सामन्यातील इम्पॅक्ट खेळाडू रोहन कदम यांना चषक सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या सामन्यात  प्रमुख पाहुणे शंतन्यु मानवी, शिवानंद व काशिनाथ नाईक यांच्या हस्ते सामनावीर अंगदराज हितलमनी व सामन्यातील इम्पॅक्ट खेळाडू आकाश असलकर यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.