आयर्लंड टू सावंतवाडी ; श्रेयाने बजावला मतदानाचा हक्क
सावंतवाडी प्रतिनिधी
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आज सुरू असून सावंतवाडी शहरात कळसुलकर हायस्कूल या मतदान केंद्रावर आयर्लंड देशात नोकरीला असलेल्या श्रेया शिवप्रसाद कुडपकर हिने आज खास मतदानाचा हक्क बजावला. ती सावंतवाडी नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी शिवप्रसाद कुडपकर यांची ती कन्या आहे . तिचे शिक्षण सावंतवाडीतूनच झाले. ती सध्या आयर्लंड देशात नोकरीला आहे. भोसले पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये डी फार्मसी कोर्स पूर्ण करून ती डिग्रीसाठी आयर्लंडला गेली होती तेथे ती नोकरी करत असून गेल्या काही दिवसांपूर्वीच ती भारतातील लोकसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे आपल्या मूळ देशात आणि कोकणातील सावंतवाडी मतदार संघात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आली होती. तिने कळसुलकर हायस्कूल केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला . भारताची लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने मी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले आहे . मात्र, मतदार यादी मधील घोळाबाबत तिने नाराजी व्यक्त केली.
Home महत्वाची बातमी आयर्लंड टू सावंतवाडी ; श्रेयाने बजावला मतदानाचा हक्क
आयर्लंड टू सावंतवाडी ; श्रेयाने बजावला मतदानाचा हक्क
सावंतवाडी प्रतिनिधी रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आज सुरू असून सावंतवाडी शहरात कळसुलकर हायस्कूल या मतदान केंद्रावर आयर्लंड देशात नोकरीला असलेल्या श्रेया शिवप्रसाद कुडपकर हिने आज खास मतदानाचा हक्क बजावला. ती सावंतवाडी नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी शिवप्रसाद कुडपकर यांची ती कन्या आहे . तिचे शिक्षण सावंतवाडीतूनच झाले. ती सध्या आयर्लंड देशात नोकरीला आहे. […]