मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 96 वर्षीय मतदार दुबईतून आले खेडमध्ये!

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 96 वर्षीय मतदार दुबईतून आले खेडमध्ये!

गौरीहर खातू वयाच्या 22 व्या वर्षापासून करताहेत मतदान

खेड / प्रतिनिधी

लोकसभेसाठीच्या प्रत्येक निवडणुकीत न चूकता मतदानाचा हक्क बजावणारे समर्थनगर, खेड येथील 96 वर्षीय गौरीहर उर्फ दादा खातू हे दुबईतून थेट खेड मध्ये येवून त्यांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. वयाच्या 22 व्या वर्षापासून ते मतदानाचा हक्क बजावत आहेत.