चिकोडी लोकसभा मतदारसंघासाठी विशेष अनुदानाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

खासदार प्रियांका जारकीहोळी यांचे निवेदन बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदारसंघातील विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्यादृष्टीने विविध विकासकामे राबविण्यासाठी विशेष अनुदान मंजूर करण्याची मागणी खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे. रविवारी बेंगळूर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी एक निवेदन दिले आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील यमकनमर्डी, हुक्केरी, निपाणी, चिकोडी, सदलगा, कागवाड, अथणी, रायबाग, कुडची अशी एकूण आठ […]

चिकोडी लोकसभा मतदारसंघासाठी विशेष अनुदानाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

खासदार प्रियांका जारकीहोळी यांचे निवेदन
बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदारसंघातील विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्यादृष्टीने विविध विकासकामे राबविण्यासाठी विशेष अनुदान मंजूर करण्याची मागणी खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे. रविवारी बेंगळूर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी एक निवेदन दिले आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील यमकनमर्डी, हुक्केरी, निपाणी, चिकोडी, सदलगा, कागवाड, अथणी, रायबाग, कुडची अशी एकूण आठ विधानसभा मतदारसंघात विकासकामे राबविण्यासाठी विशेष अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थी व नागरिकांच्या हितासाठी विविध कामे हाती घ्यायची आहेत. समाजकल्याण, अनुसूचित जाती-जमाती कल्याण, लघुपाटबंधारे, पाटबंधारे, धर्मादाय, ग्रामीण विकास व पंचायत राज, पर्यटन, युवा सबलीकरण व क्रीडा खाते, मागासवर्गीय कल्याण, अल्पसंख्याक कल्याण खाते व शिक्षण क्षेत्रासंबंधी कामे राबविण्यासाठी 60 कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर करण्याची मागणी खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून विशेष अनुदान मंजूर करण्याची ग्वाही दिली आहे. यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व बुडा चेअरमन लक्ष्मणराव चिंगळे, सतीश शुगर्सचे संचालक राहुल जारकीहोळी, केपीसीसीचे सरचिटणीस महावीर मोहिते, शंकरगौडा पाटील आदी उपस्थित होते.