शहापूर, वडगावमध्ये आज रंगपंचमी

बेळगाव : शहापूर, वडगाव तसेच तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये शनिवारी पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. होळीचे दहन झाल्यानंतर पाचव्या दिवशी खरेतर रंगपंचमी साजरी करण्यात येते. परंतु यंदा सहाव्या दिवशी रंगपंचमी आलेली आहे. बेळगावमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी धूळवड साजरी केली जाते. तर शहापूर आणि वडगाव परिसरात पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली […]

शहापूर, वडगावमध्ये आज रंगपंचमी

बेळगाव : शहापूर, वडगाव तसेच तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये शनिवारी पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. होळीचे दहन झाल्यानंतर पाचव्या दिवशी खरेतर रंगपंचमी साजरी करण्यात येते. परंतु यंदा सहाव्या दिवशी रंगपंचमी आलेली आहे. बेळगावमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी धूळवड साजरी केली जाते. तर शहापूर आणि वडगाव परिसरात पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. यासाठी शहापूर बाजारपेठेमध्ये पिचकाऱ्या, रंग, फुगे, मुखवटे दाखल झाले आहेत. विद्यार्थी आणि बालचमूने शुक्रवारपासूनच हे साहित्य खरेदी करून जय्यत तयारी केली आहे. अलीकडच्या काळात रेनडान्स करत रंगपंचमी साजरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शक्यतो कोरडे रंग खेळण्याचे आवाहन ज्येष्ठांनी केले आहे. दरम्यान सालाबादप्रमाणे कै. नारायण जाधव सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे शनिवार दि. 30 रोजी सकाळी 9.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्कल खासबाग येथे नैसर्गिक फुलांची रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे.