Pune : क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Pune : क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

काळ कधी आणि कुठे झडप घालेल हे कोणीही सांगू शकत नाही. क्रिकेट खेळताना एका व्यक्तीला हृदयविकाराच्या तीव्र झटका येऊन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पिंपरी चिंचवडच्या सांगवी येथे घडली आहे. मिलिंद भोंडवे असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

पिंपरी चिंचवडच्या सांगवी येथे पीडब्ल्यूडी मैदानावर क्रिकेटच्या स्पर्धा सुरु आहे. स्पर्धेचा तिसरा दिवस असून संघाचा सामना सुरु असताना गोलंदाजी करताना मिलिंदला चक्कर आली आणि तो खाली कोसळला . त्याला तातडीने रुग्णालयात नेले असताना त्याच्या मृत्यू  हृदयविकाराचा झटका येऊन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिलिंद यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

 

Edited by – Priya Dixit  

Go to Source