घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

सोमवारी मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात घाटकोपरमध्ये एक मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याची दुर्घटना घडली. होर्डिंग कोसळल्यानंतर त्याखाली अनेक गाड्या आणि लोकं अडकल्याची माहिती होती. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला असून आता 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. तर 43 जण जखमी झाले आहेत. अद्याप होर्डिंगखालून 74 जणांना बाहेर काढलं असल्याची माहिती आहे. होर्डिंग ओनरवर गुन्हा दाखल घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिडे आणि इतरांविरोधात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती आहे. संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसात घाटकोपरमधल्या पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं होतं. या दुर्घटनेतील जखमींवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपर दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबाबत हे आदेश दिले. या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदतही मुख्यत्र्यांकडून जाहीर करण्यात आली आहे.  घाटकोपरमध्ये कोसळलेले होर्डिंग्ज अनधिकृत? घाटकोपरमध्ये कोसळलेले ते होर्डिंग्ज अनधिकृत होते असा आरोप केला जातोय. यावेळी पालिकेने संबंधित होर्डिंग उभारणीवर आक्षेप घेतला होता. पालिका केवळ 40 फूट × 40 फूट होर्डिंग उभारणीला परवानगी देते. परंतु कोसळलेले होर्डिंग  120 फूट × 120 फुटांचे असल्याची माहिती आहे.  इगो मिडिया कंपनीने होर्डिंग उभारले होते. रेल्वेच्या जागेवर हे होर्डिंग होते.हेही वाचा Mumbai Rains घाटकोपरमध्ये मोठे होर्डिंग कोसळले, 7 जण जखमी”>Mumbai Rains घाटकोपरमध्ये मोठे होर्डिंग कोसळले, 7 जण जखमीबीएमसीच्या मान्सूनपूर्व मोहिमेत 1,644 डेंग्यू हॉटस्पॉट्स आढळले

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

सोमवारी मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात घाटकोपरमध्ये एक मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याची दुर्घटना घडली. होर्डिंग कोसळल्यानंतर त्याखाली अनेक गाड्या आणि लोकं अडकल्याची माहिती होती. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला असून आता 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. तर 43 जण जखमी झाले आहेत. अद्याप होर्डिंगखालून 74 जणांना बाहेर काढलं असल्याची माहिती आहे. होर्डिंग ओनरवर गुन्हा दाखलघाटकोपर दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिडे आणि इतरांविरोधात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती आहे. संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसात घाटकोपरमधल्या पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं होतं. या दुर्घटनेतील जखमींवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.दरम्यान घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपर दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबाबत हे आदेश दिले. या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदतही मुख्यत्र्यांकडून जाहीर करण्यात आली आहे. घाटकोपरमध्ये कोसळलेले होर्डिंग्ज अनधिकृत?घाटकोपरमध्ये कोसळलेले ते होर्डिंग्ज अनधिकृत होते असा आरोप केला जातोय. यावेळी पालिकेने संबंधित होर्डिंग उभारणीवर आक्षेप घेतला होता. पालिका केवळ 40 फूट × 40 फूट होर्डिंग उभारणीला परवानगी देते. परंतु कोसळलेले होर्डिंग  120 फूट × 120 फुटांचे असल्याची माहिती आहे.  इगो मिडिया कंपनीने होर्डिंग उभारले होते. रेल्वेच्या जागेवर हे होर्डिंग होते.हेही वाचाMumbai Rains घाटकोपरमध्ये मोठे होर्डिंग कोसळले, 7 जण जखमी”>Mumbai Rains घाटकोपरमध्ये मोठे होर्डिंग कोसळले, 7 जण जखमी
बीएमसीच्या मान्सूनपूर्व मोहिमेत 1,644 डेंग्यू हॉटस्पॉट्स आढळले

Go to Source