हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामासाठी हालचाली गतिमान
स्थगिती उठविल्यानंतर कंत्राटदाराने दाखल केली यंत्रसामग्री : पावसाळ्यापूर्वी माती-खडी टाकून सपाटीकरण होण्याची शक्यता
बेळगाव : हलगा-मच्छे बायपासचे काम करण्यासाठी कंत्राटदाराने यंत्रसामग्री या रस्त्यासमीप उभी केली आहे. न्यायालयातून स्थगिती उठताच या रस्त्याच्या कामासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी किमान माती व खडी टाकून सपाटीकरण करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा फटका बसणार आहे. हलगा-मच्छे बायपास रस्ता गेल्या 10 ते 12 वर्षांपासून करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. अलारवाड क्रॉसपासून मच्छे गावापर्यंत जवळपास 11 कि.मी.चा हा रस्ता केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी रस्त्यावरील लढाईबरोबरच न्यायालयीन लढाई लढली. मात्र काही शेतकऱ्यांनी न्यायालयातून माघार घेतल्यामुळे इतर शेतकऱ्यांना फटका बसला. न्यायालयानेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची बाजू उचलून धरत स्थगिती उठविली. यापूर्वी अनेकवेळा दडपशाही करत हा रस्ता करण्याचा प्रयत्न सुरू होता. तरीदेखील शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला होता. जिल्हा न्यायालयाबरोबरच उच्च न्यायालयापर्यंत शेतकऱ्यांनी लढा लढला. सदर रस्ता हा तिबारपिकी जमिनीतून होत असल्याने आम्ही त्याला विरोध करत असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले होते. मात्र हा रस्ता शहरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी केला जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले होते. या रस्त्यासंदर्भात नोटिफीकेशन देताना झिरोपॉईंट ते मच्छे असा उल्लेख केला होता. त्यामुळे झिरोपॉईंटचा मुद्दा धरत शेतकऱ्यांनी न्यायालयामध्ये वकिलांमार्फत न्यायालयीन लढा लढला. पण अनेक शेतकऱ्यांनी न्यायालयात जाण्याऐवजी रक्कम घेतली. तर काही मोजक्याच शेतकऱ्यांनी न्यायालयात स्थगितीसाठी अर्ज केले. न्यायालयाने स्थगिती दिली. मात्र मागील तारखेवेळी काही शेतकऱ्यांनी त्यामधून माघार घेतल्यामुळे समस्या निर्माण झाली. अखेर उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची बाजू ग्राह्या मानत स्थगिती उठविली. कंत्राटदार सर्व यंत्रसामग्रीसह कामासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी अलारवाड क्रॉस व येळ्ळूर रस्त्यावरदेखील यंत्रसामग्री उभी केली आहे. त्यामुळे रस्त्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे.
Home महत्वाची बातमी हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामासाठी हालचाली गतिमान
हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामासाठी हालचाली गतिमान
स्थगिती उठविल्यानंतर कंत्राटदाराने दाखल केली यंत्रसामग्री : पावसाळ्यापूर्वी माती-खडी टाकून सपाटीकरण होण्याची शक्यता बेळगाव : हलगा-मच्छे बायपासचे काम करण्यासाठी कंत्राटदाराने यंत्रसामग्री या रस्त्यासमीप उभी केली आहे. न्यायालयातून स्थगिती उठताच या रस्त्याच्या कामासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी किमान माती व खडी टाकून सपाटीकरण करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा फटका […]