मलप्रभा नदी स्वच्छता मोहीम यशस्वी

स्वच्छतेची व्याख्यानेद्वारे जनजागृती : कचरा मिरवणूक चर्चेचा विषय खानापूर : परिसरकागी नाऊ या संघटनेच्या बेळगाव शाखेच्या माध्यमातून मलप्रभा नदी स्वच्छता मोहीम नुकतीच राबवण्यात आली. एकाचवेळी नदीच्या उगमापासून संगमापर्यंत आठ ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या प्रकारची स्वच्छता मोहीम राबवण्याची ही पहिलीच वेळ असून यात स्वच्छते मोहिमेबरोबरच व्याख्यानेद्वारे जगजागृतीही करण्यात आली. यावेळी पर्यावरण प्रेमी शिवाजी […]

मलप्रभा नदी स्वच्छता मोहीम यशस्वी

स्वच्छतेची व्याख्यानेद्वारे जनजागृती : कचरा मिरवणूक चर्चेचा विषय
खानापूर : परिसरकागी नाऊ या संघटनेच्या बेळगाव शाखेच्या माध्यमातून मलप्रभा नदी स्वच्छता मोहीम नुकतीच राबवण्यात आली. एकाचवेळी नदीच्या उगमापासून संगमापर्यंत आठ ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या प्रकारची स्वच्छता मोहीम राबवण्याची ही पहिलीच वेळ असून यात स्वच्छते मोहिमेबरोबरच व्याख्यानेद्वारे जगजागृतीही करण्यात आली. यावेळी पर्यावरण प्रेमी शिवाजी कागणीकर आणि दिलीप कामत यांनी उपस्थितांना नदी आणि पर्यावरणाबाबत मार्गदर्शन केले. मलप्रभा नदीच्या उगमस्थान असलेल्या कणकुंबीपासून ही मोहीम सुरुवात करण्यात आली. यावेळी कणकुंबी, हब्बनहट्टी, बेटणे, आमटे, जांबोटी, चापोली, ओलमणी, कुसमळी, खानापूर, असोगा या ठिकाणी एकाच वेळी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. परिसरकागी नाऊ या संस्थेने आव्हान केल्याप्रमाणे स्थानिकांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला.
कचऱ्याचे पिरनवाडीत एकत्रिकीकरण
यावेळी लोकानी नदीला अर्पण केलेले देवदेवतांचे फोटो यासह इतर धार्मिक साहित्य, प्लास्टिक, कचरा, पिशव्या, अंत्यसंस्काराचे साहित्य तसेच काही अवशेष यासह नदीत जमलेला कचरा एकत्र करण्यात आला. यानंतर हा सर्व कचरा त्या त्या ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये घालून जनजागृतीसाठी फलक घेऊन मिरवणूक काढण्यात आली. कचरा पिरनवाडी येथे एकत्रिकीकरण करण्यात आल्यानंतर तेथून ट्रॅक्टरने तुरमुरी येथील कचरा डेपोत नेण्यात आला. यावेळी प्रबोधनात्मक फलक हातात धरण्यात आले होते. तसेच ध्वनिक्षेपकावरुन नदी आणि पर्यावरण रक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात येत होते. यामुळे ही कचरा वाहतूक करणारी मिरवणूक नागरिकांच्या चर्चेचा विषय झाला.