पहिल्या रेल्वेगेटवरील फाटकामध्ये बिघाड

बेळगाव : टिळकवाडी येथील पहिले रेल्वेगेटमध्ये बिघाड झाल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजता रेल्वेगेटच्या लोखंडी खांबामध्ये बिघाड झाल्याने गेट बंद होते. एखाद्या वाहनाने धडक दिल्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु, या घडलेल्या प्रकारामुळे वाहनचालक मात्र बराच वेळ थांबून होते. बेळगावमधील रेल्वेगेटला सेन्सर बसविण्यात आले आहेत. यामध्ये थोडा जरी बिघाड झाला तर रेल्वेगेट बंद […]

पहिल्या रेल्वेगेटवरील फाटकामध्ये बिघाड

बेळगाव : टिळकवाडी येथील पहिले रेल्वेगेटमध्ये बिघाड झाल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजता रेल्वेगेटच्या लोखंडी खांबामध्ये बिघाड झाल्याने गेट बंद होते. एखाद्या वाहनाने धडक दिल्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु, या घडलेल्या प्रकारामुळे वाहनचालक मात्र बराच वेळ थांबून होते. बेळगावमधील रेल्वेगेटला सेन्सर बसविण्यात आले आहेत. यामध्ये थोडा जरी बिघाड झाला तर रेल्वेगेट बंद ठेवावे लागते. शुक्रवारी सायंकाळी रेल्वेगेट बंद असल्याने रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रेल्वेगेट एका बाजूला कलंडल्याचे दिसून आले. एखाद्या वाहनाने धडक दिली असावी, अशी शक्यता वर्तविली जात होती. याबाबत रात्री उशिरापर्यंत अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही.