उमेदवारांसह जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी निभावला मतदानाचा हक्क; पहा कोणकोण आहेत रांगेत

उमेदवारांसह जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी निभावला मतदानाचा हक्क; पहा कोणकोण आहेत रांगेत

कोल्हापूर जिल्ह्यातील चुरशीच्या लोकसभा निवडणूकीसाठी आज मतदान होत असून त्यासाठी गेल्या महिनाभरापासून उमेदवारांपासून पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. आज प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील असंख्य मतदान केंद्रावर उत्साहाने मतदानासाठी रांगा लागल्याचं दिसून आले आहे.
सामान्य़ मतदारांबरोबरच मतदारसंघातील दोन्ही उमेदवरांनी तसेच पक्षाच्या नेत्यांनीही आपापल्या मतदान केंद्रावर मतदान केलं. त्याच बरोबर त्यांनी मतदारांना मतदान करण्यासाठीही आवाहन केलं.
छत्रपती परिवाराने एकत्रित येऊन केले मतदान

आज कोल्हापूरातील न्यु पॅलेस परिसरातील शाळेत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी आपल्या राजपरिवारासह जाऊन मतदान केलं. यावेळी त्यांच्या बरोबर संभाजी राजे छत्रपती यांनी संपुर्ण जिल्ह्यात शाहू महाराज छत्रपतींची लाट असल्याचं म्हटलं आहे. शाहू महाराज यांनी सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती तसेच शहाजीराजे, यशस्विनीराजे आणि यशराजे यांनीही मतदान केलं.
लग्नकार्याच्या घाईत महाडिक कुटुंबियाकडून मतदान
आज सकाळी राज्यसभेचे खासदार धनंजय़ महाडिक हे आपल्या परिवारासह बाजारसमितीच्या मतदान केंद्रावर दाखल झाले. आपल्या कुटुंबासह त्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्याच्या सोबत त्याच्या पत्नी अरुंधती महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक उपस्थित होते.
रांगेत उभारून सतेज पाटीलांनी केलं मतदान
कसबा बावड्यातील मतदानकेंद्रावर आज काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी मतदानाच्या रांगेमध्ये उभा राहून आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी बोलताना त्यांनी कोल्हापुरातील जनता महाविकास आघाडीच्या बाजूने असून महाराष्ट्रत मिरॅकल घडणार असल्याचे संकेत दिले. तसेच जनतेचा इंडिया आघाडीलाच कौल असून शाहू महाराजांचा आवाज दिल्लीत जाणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
राजू शेट्टी यांना विजयाची खात्री…

राजू शेट्टी यांनी आज आपल्या गावी मतदानाचा हक्क बजावला. मागिल वेळी आपला पराभव हा कटकारस्थानामुळे झाला होता पण त्यानंतर मी कुणालाही शिव्याशाप न देता काम करत राहीलो त्यामुळे हा विजय आपलाच असल्याचं म्हटलं आहे.
धैर्यशील माने यांचे सपत्नीक मतदान…

खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या रुकडी या गावामध्ये आपल्या जाऊन सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना त्यांनी यावेळीसुद्धा विजयाचा गुलाल आम्हालाच लागणार… नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असा विश्वास व्यक्त केला.