कळंबा ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई यात्रा उत्साहात पार : दै. ‘तरुण भारत’ संवाद विशेष अंकांचे प्रकाशन

कळंबा ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई यात्रा उत्साहात पार : दै. ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’ संवाद विशेष अंकांचे प्रकाशन

वार्ताहर कळंबा :

येथील कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या वार्षिक यात्रेची मंगळवारी 14 रोजी यात्रा उत्साहात साजरी झाली कार्यक्रमावेळी दै. ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’ विशेष अंकाचे प्रकाशन सरपंच सुमन गुरव माजी सरपंच सागर भोगम,विश्वास गुरव ,अरुण टोपकर, भारत पाटील, गजानन टोपकर, श्रीकांत पाटील, दीपक तिवले, प्रकाश कदम,अशोक पाटील,श्रीपाद चौगुले, मधुकर बावडेकर, अशोक बाराले, राजू तिवले, महादेव साळोखे (अण्णा), रोहित जगताप,हिंदुराव तिवले, विजय खानविलकर, संग्राम जाधव, भिकाजी गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. सकाळी मंदिराच्या पुजाऱ्यांनी दुग्धाभिषेक करून देवीची पारंपरिक अन्नपूर्णाच्या स्वरूपात अलंकारिक पूजा बांधली. ही पूजा श्रीपूजक पूजा भिकाजी गुरव, संतोष गुरव, प्रवीण गुरव, अशोक गुरव, महेश गुरव, तानाजी गुरव, प्रथमेश गुरव, दिगंबर गुरव, संजय गुरव, प्रथमेश गुरव, सोहम गुरव यांनी बांधली होती.

सकाळी 11 वाजता सरपंच सुमन गुरव माजी सरपंच सागर भोगम अरुण टोपकर शशिकांत तिवले प्रकाश कदम बाजीराव पोवार भारत पाटील, भगवान पाटील, श्रीकांत पाटील, दिलीप टिपुगडे, संदिप पाटील, अजित पाटील, उत्तम जाधव, अजित तिवले अदी मान्यवरांच्या उपस्तीत महाप्रसदला सुरवात झाली. सुमारे सात-आठ हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची आठ दिवस चाललेल्या यात्रेची मंगळवारी महाप्रसादाने सांगता झाली. गेल्या आठ दिवसात यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यात्राकाळात कात्यायनी भेटीचा पालखी सोहळा, हनुमान भेटीचा पालखी सोहळा, होम हवन असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. तर गावातील अनेक तरुण मंडळाच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात्राकाळात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी अंबाबाई भक्तगण मंडळाबरोबरच कळंबा ग्रामपंचायत प्रशासन व महालक्ष्मी भक्तमंडळ व यात्रा कमिटीने विशेष परिश्रम घेतले.