इस्रोप्रमुख सोमनाथ यांना कर्करोग
आदित्य-एल1 प्रक्षेपणाच्या दिवशी झाले होते निदान
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ (60 वर्षे) यांना कर्करोग (कॅन्सर) झाल्याचे समोर आले आहे. सोमनाथ यांनी एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत यासंबंधीची पुष्टी दिली आहे. चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणापासून (23 ऑगस्ट) आरोग्यासंबंधी काही समस्या उद्भवल्या होत्या. परंतु त्यावेळी काहीच स्पष्ट झाले नव्हते. मला देखील कर्करोगावरून कुठलीच ठोस माहिती नव्हती, असे सोमनाथ यांनी म्हटले आहे.
आदित्य-एल1 च्या प्रक्षेपणाच्या (2 सप्टेंबर) दिवशी नियमित तपासणीसाठी गेलो होतो, तेव्हा स्कॅनमध्ये पोटात कॅन्सर पेशी निर्माण झाल्याचे निदान झाले होते, असे त्यांनी सांगितले आहे. सोमनाथ यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. तसेच कीमोथेरपीलाही ते सामोरे गेले आहेत.
एस. सोमनाथ यांच्या कार्यकाळात इस्रोने इतिहास रचला आहे. इस्रोने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर यशस्वीपणे चांद्रयान-3 चे लँडिंग करविले होते. तसेच पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावरील लॅगरेंज पॉइंटवर सूर्याच्या अध्ययनासाठी आदित्य-एल1 यशस्वीपणे प्रक्षेपित केला होता.
उपचार सुरू आहेत : सोमनाथ
कर्करोगाचे निदान झाल्यावर सोमनाथ यांनी चेन्नईत आणखी काही तपासण्या करवून घेतल्या होत्या. यानंतर कर्करोग झाल्याचे पुन्हा स्पष्ट झाले होते. कर्करोगामुळे त्यांच्या शरीरात काही बदल दिसून येऊ लागले होते. कर्करोगाचे निदान होणे माझ्या कुटुंबासाठी धक्कादायक होते. सध्या मी या आजाराविषयी जाणून घेत उपचार करवून घेत आहे. पूर्णपणे कधीपर्यंत बरा होऊ शकेन हे सांगणे अवघड असल्याचे सोमनाथ यांनी म्हटले आहे. इस्रोप्रमुख हे चार दिवसांपर्यंत रुग्णालयात दाखल होते, तर पाचव्या दिवशी त्यांनी पुन्हा कार्यालयात जाण्यास सुरुवात केली होती. सोमनाथ यांची नियमित वैद्यकीय तपासणी आणि स्कॅनिंग होत राहणार आहे.
Home महत्वाची बातमी इस्रोप्रमुख सोमनाथ यांना कर्करोग
इस्रोप्रमुख सोमनाथ यांना कर्करोग
आदित्य-एल1 प्रक्षेपणाच्या दिवशी झाले होते निदान वृत्तसंस्था/ बेंगळूर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ (60 वर्षे) यांना कर्करोग (कॅन्सर) झाल्याचे समोर आले आहे. सोमनाथ यांनी एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत यासंबंधीची पुष्टी दिली आहे. चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणापासून (23 ऑगस्ट) आरोग्यासंबंधी काही समस्या उद्भवल्या होत्या. परंतु त्यावेळी काहीच स्पष्ट झाले नव्हते. मला देखील कर्करोगावरून कुठलीच […]