आयपीएल फ्रँचायजींची बैठक 16 एप्रिलला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या सुरु असलेल्या 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध 10 संघांच्या फ्रेंचाइजीची (मालक) बैठक 16 एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. बीसीसीआयने ही बैठक आयोजित केली असून त्यामध्ये केवळ औपचारिकता राहिल.
16 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. या बैठकीसाठी ठळक मुद्दे (अजेंडा) राहणार नाही केवळ विविध संघांच्या फ्रेंचाइजीसमवेत औपचारिक चर्चा करण्याचे बीसीसीआयने ठरविले आहे. या बैठकीमध्ये आयपीएलच्या क्रिकेटपटूंच्या नियमामध्ये प्रत्येक संघाला देण्यात येणाऱ्या मूळ रकमेमध्ये (100 कोटी) वाढ करण्याबाबत चर्चा होईल, असे सांगण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी आयपीएल फ्रँचायजींची बैठक 16 एप्रिलला
आयपीएल फ्रँचायजींची बैठक 16 एप्रिलला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सध्या सुरु असलेल्या 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध 10 संघांच्या फ्रेंचाइजीची (मालक) बैठक 16 एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. बीसीसीआयने ही बैठक आयोजित केली असून त्यामध्ये केवळ औपचारिकता राहिल. 16 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. या बैठकीसाठी ठळक मुद्दे […]