तेरा क्या होगा लवली’मध्ये इलियाना

रणदीप हुड्डा देखील मुख्य भूमिकेत इलियाना डिक्रूजचा आगामी चित्रपट ‘तेरा क्या होगा लवली’चा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कॉमेडी आणि ड्रामाने युक्त या चित्रपटाचा ट्रेलर भरभरून हसायला लावणारा आहे. चित्रपटात इलियानासोबत रणदीप हुड्डा महत्त्वाची भूमिका साकारत आहे. ट्रेलरच्या प्रारंभी इलियानाची व्यक्तिरेखा दाखविण्यात आली असून यात तिच्या फोटोला एडिटिंगद्वारे गोरा केला जात असल्याचे दाखविण्यात आले. चित्रपटात […]

तेरा क्या होगा लवली’मध्ये इलियाना

रणदीप हुड्डा देखील मुख्य भूमिकेत
इलियाना डिक्रूजचा आगामी चित्रपट ‘तेरा क्या होगा लवली’चा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कॉमेडी आणि ड्रामाने युक्त या चित्रपटाचा ट्रेलर भरभरून हसायला लावणारा आहे. चित्रपटात इलियानासोबत रणदीप हुड्डा महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
ट्रेलरच्या प्रारंभी इलियानाची व्यक्तिरेखा दाखविण्यात आली असून यात तिच्या फोटोला एडिटिंगद्वारे गोरा केला जात असल्याचे दाखविण्यात आले. चित्रपटात इलियानाच्या व्यक्तिरेखेचे नाव लवली असून तिचा रंग अत्यंत सावळा असल्याचे दर्शविले गेले आहे. सावळ्या वर्णामुळे तिचा विवाह जुळत नसतो.
रणदीप हुड्डाने यात एका पोलिसाची भूमिका साकारली आहे. चोरीचे प्रकरण हाताळताना लवलीच्या प्रेमात पडणाऱ्या युवकाची भूमिका त्याने उत्तमप्रकारे पार पाडली आहे. हा चित्रपट समाजाला एक संदेश देणारा देखील आहे. ‘लवलीच्या लाइफमध्ये एक गोष्ट नेहमीच पक्की आहे, ‘बॅक-टू-बॅक सियाप्पा’ असे इलियानाने नमूद केले आहे. हा चित्रपट 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाद्वारे इलियाना बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. तर रणदीप हु•ा हा लिन लॅशरामसोबत विवाह केल्यावर पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन बलविंदर सिंह जनूजा यांनी केले आहे. चित्रपटात इलियाना आणि रणदीपसोबत करण कुंद्रा, गीतिका विद्या आणि वरुण शर्मा यासारखे कलाकारही दिसून येणार आहेत.