जिल्हाधिकारी आवारात पोलीस-शेतकऱ्यांत हायड्रामा
जिल्हा प्रशासनावर मोर्चा : आंदोलन करणाऱ्यांना रोखताना पोलिसांची दमछाक, शेतकरी-पोलिसांत बाचाबाची
बेळगाव : संपूर्ण कर्जमाफीसह घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी येणाऱ्या आर्थिक संस्थांच्या अधिकाऱ्यांना त्वरित थांबविण्यात यावे. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विविध शेतकरी संघटनांकडून काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पोलीस व शेतकऱ्यांमध्ये हायड्रामा झाल्याची घटना मंगळवारी घडली. यामुळे पोलीस व शेतकऱ्यांत वादावादी झाली. शेतकऱ्यांना रोखताना पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा देण्यात आलेला नाही. असे असताना कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांकडे आर्थिक संस्थांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात आहे. बँकांसह फायनान्सकडून कर्जवसुलीसाठी नोटीस दिल्या जात आहेत. फायनान्सकडून वाहने जप्त करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्ज भरणे अशक्य आहे. तरी देखील आर्थिक संस्थांकडून कर्जवसुलीचा तगादा सुरूच आहे. कर्जवसुली त्वरित थांबविण्यात यावी. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, या मागणीसाठी विविध शेतकरी संघटनांकडून कन्नड साहित्य भवन येथून जिल्हा प्रशासनावर मोर्चा काढण्यात आला.
चन्नम्मा चौकात आंदोलन करण्यात आले. येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. दरम्यान, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिरण्यापासून रोखून धरले. दरम्यान, संतापलेल्या शेतकऱ्यांकडून जिल्हा न्यायालयाच्या आवारासमोरील रस्त्यांवर जावून धरणे आंदोलन सुरू केले. रास्ता रोको करून राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आवाराच्या बाजुने असणारी लोखंडी जाळी ओलांडून आवारामध्ये प्रवेश केला. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वारासह इतर बाजुंनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. यावेळी शेतकऱ्यांना रोखून धरण्यात पोलिसांना अपयश आले. यामुळे एकच धावपळ उडाली. शेवटी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश करून आंदोलन सुरू केले. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी नितेश पाटील व इतर अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणे भाग पडले.
रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांना रोखणे अशक्य
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस फौजफाटा असूनही रणरणत्या उन्हात मोर्चा काढून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखणे अशक्य झाले. यामुळे शेतकरी व पोलिसांत बाचाबाची झाली. यावेळी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, एसीपी सदाशिव कट्टीमनी, पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.
Home महत्वाची बातमी जिल्हाधिकारी आवारात पोलीस-शेतकऱ्यांत हायड्रामा
जिल्हाधिकारी आवारात पोलीस-शेतकऱ्यांत हायड्रामा
जिल्हा प्रशासनावर मोर्चा : आंदोलन करणाऱ्यांना रोखताना पोलिसांची दमछाक, शेतकरी-पोलिसांत बाचाबाची बेळगाव : संपूर्ण कर्जमाफीसह घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी येणाऱ्या आर्थिक संस्थांच्या अधिकाऱ्यांना त्वरित थांबविण्यात यावे. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विविध शेतकरी संघटनांकडून काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पोलीस व शेतकऱ्यांमध्ये हायड्रामा झाल्याची घटना मंगळवारी घडली. यामुळे पोलीस व शेतकऱ्यांत वादावादी झाली. शेतकऱ्यांना रोखताना पोलिसांची […]