भाजप सरकारच्या अपयशामुळे न्यायाधीशांना करावी लागली पाहणी

पणजी : भाजप सरकारच्या अपयशामुळे माननीय न्यायाधीशांना येऊन ‘स्मार्ट सिटी’च्या कामाची पाहणी करावी लागली, त्यामुळे राजधानीत गोंधळ उडाला आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे काँग्रेसने मंगळवारी म्हटले आहे. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना भाजप सरकारचे वारंवार अपयश समोर येत असल्याचा आरोप केला. काल मंगळवारी काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार […]

भाजप सरकारच्या अपयशामुळे न्यायाधीशांना करावी लागली पाहणी

पणजी : भाजप सरकारच्या अपयशामुळे माननीय न्यायाधीशांना येऊन ‘स्मार्ट सिटी’च्या कामाची पाहणी करावी लागली, त्यामुळे राजधानीत गोंधळ उडाला आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे काँग्रेसने मंगळवारी म्हटले आहे. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना भाजप सरकारचे वारंवार अपयश समोर येत असल्याचा आरोप केला. काल मंगळवारी काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कवठणकर यांनी वरील आरोप केला. कोविड महामारीच्या काळातही न्यायालयाने परिस्थितीचा सामना करण्यासाठी अनेक निर्देश देऊन महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांची टीम लोकांचे प्राण वाचवण्यात अयशस्वी ठरले आहेत. स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या कामांमुळे होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणाबाबतच्या जनहित याचिकांची दखल घेत, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी स्थळांची पाहणी केली. प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी सर्व उपाययोजना करत असल्याचे दाखवण्यासाठी भाजप सरकारने न्यायाधीशांच्या आगमनापूर्वी अनेक पाण्याचे टँकर वापरून पणजीतील रस्ते धुतले. त्यामुळे न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय राज्यात चांगल्या गोष्टी घडतील, अशी अपेक्षा करू शकत नाही, असे कवठणकर म्हणाले. स्मार्ट सिटीचे काम दर्जेदार असल्याचा आरोप खुद्द भाजपच्या पणजी आमदाराने केला होता. त्यात योग्य विकासाची दृष्टी नाही त्यामुळे शहरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे लोक त्रस्त आहेत आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. स्मार्ट सिटीचे काम पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. ही चिंताजनक परिस्थिती आहे की न्यायाधीशांना येऊन जनहित याचिकांची स्वत:हून दखल घेऊन कामाची पाहणी करावी लागली, असेही ते म्हणाले.