नंदगडसह ग्रामीण भागात होळी-धूलिवंदन

वार्ताहर /नंदगड नंदगड, बिडी, बेकवाड ग्रामीण भागात होळी व धूलिवंदन सण पांरपरिकरित्या उत्साहात साजरा करण्यात आला. नंदगड येथे रविवारी होळी पौर्णिमेदिवशी गावाजवळील खासगी शेतवडीतील सावर व माडतीच्या झाडाची लाकडे आणून होळी केली. लाकडे वेशीत आणल्यानंतर सुहासिनीकडून आरती केली. रात्री 9.30 वा. होळी रोवली. पाच मानकरी मंडळीकडून होळीला नैवेद्य दाखविला. होळी रोवल्यानंतर कामण्णा जाळण्यात येतो. कामण्णा […]

नंदगडसह ग्रामीण भागात होळी-धूलिवंदन

वार्ताहर /नंदगड
नंदगड, बिडी, बेकवाड ग्रामीण भागात होळी व धूलिवंदन सण पांरपरिकरित्या उत्साहात साजरा करण्यात आला. नंदगड येथे रविवारी होळी पौर्णिमेदिवशी गावाजवळील खासगी शेतवडीतील सावर व माडतीच्या झाडाची लाकडे आणून होळी केली. लाकडे वेशीत आणल्यानंतर सुहासिनीकडून आरती केली. रात्री 9.30 वा. होळी रोवली. पाच मानकरी मंडळीकडून होळीला नैवेद्य दाखविला. होळी रोवल्यानंतर कामण्णा जाळण्यात येतो. कामण्णा जाळल्याने वाईट प्रवृती नष्ट झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात येते. सोमवारी धूलिवंदन कार्यक्रम साजरा केला. सकाळपासून दुपारी 12 पर्यंत गल्लोगल्ली रंग लाऊन आनंदोत्सव साजरा केला. डॉल्बीच्या नादात तरुणानी नृत्य केले. धूलिवंदनानिमित्त परंपरेनुसार प्रत्येकाच्या दरवाज्यात धूळ टाकली. सायंकाळी चव्हाट्याची व होळीची विधिवत पूजा करण्यात आली.