जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे हिंदू बालसंस्कार शिबिर
बेळगाव : जिजाऊ ब्रिगेडच्या राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे बुधवारी न्यू उदय भुवनच्या सभागृहात हिंदू बालसंस्कार शिबिर घेण्यात आले. नोंदणी झाल्यानंतर अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. सरनोबत यांनी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे स्वागत करून शिबिराचा हेतू सांगितला व हिंदू धर्म पूजाविधी याबद्दल माहिती दिली. पहिल्या सत्रात किशोर काकडे यांनी वाचनाचे महत्त्व सांगून देशभक्तीपर गीते शिकविली. यानंतरच्या सत्रात यम्मी महारुद्र यांनी मुलांना स्वसंरक्षणाबद्दल माहिती दिली व प्रात्यक्षिके करून घेतली. निमाई पाटील यांनी योगाचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिक करून घेतले. भोजनानंतर सुनीता पाटणकर यांनी प्रबोधनपर गोष्टी सांगून कथाकथनाचे महत्त्व स्पष्ट केले. शेवटच्या सत्रात सुचिता पाटील यांनी कला व हस्तकलेबद्दल माहिती दिली. विविध खेळातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली तर प्रत्येक शिबिरार्थीला प्रमाणपत्र व हनुमान चालिसा पुस्तिका भेट देण्यात आली. दीपाली मालकरी यांनी सूत्रसंचालन केले. शिबिरासाठी कार्यकारिणी सदस्यांनी व राजश्री आजगावकर यांनी विशेष सहकार्य केले.
Home महत्वाची बातमी जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे हिंदू बालसंस्कार शिबिर
जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे हिंदू बालसंस्कार शिबिर
बेळगाव : जिजाऊ ब्रिगेडच्या राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे बुधवारी न्यू उदय भुवनच्या सभागृहात हिंदू बालसंस्कार शिबिर घेण्यात आले. नोंदणी झाल्यानंतर अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. सरनोबत यांनी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे स्वागत करून शिबिराचा हेतू सांगितला व हिंदू धर्म पूजाविधी याबद्दल माहिती दिली. […]