विद्यार्थ्यांना शेतीच्या बांधावर मार्गदर्शन

शेतीचे ज्ञान मिळावे यासाठी केएलएस पब्लिक स्कूलचा उपक्रम बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने पिरनवाडी येथील केएलएस पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना शेतीच्या बांधावर नेऊन मार्गदर्शन करण्यात आले. आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जात असल्याने विद्यार्थ्यांना शेतीविषयीची माहिती मिळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. शेतकरी चंद्रकांत नावगेकर यांच्या शेतीला विद्यार्थ्यांनी भेट देऊन शेतीची […]

विद्यार्थ्यांना शेतीच्या बांधावर मार्गदर्शन

शेतीचे ज्ञान मिळावे यासाठी केएलएस पब्लिक स्कूलचा उपक्रम
बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने पिरनवाडी येथील केएलएस पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना शेतीच्या बांधावर नेऊन मार्गदर्शन करण्यात आले. आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जात असल्याने विद्यार्थ्यांना शेतीविषयीची माहिती मिळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. शेतकरी चंद्रकांत नावगेकर यांच्या शेतीला विद्यार्थ्यांनी भेट देऊन शेतीची माहिती जाणून घेतली. तसेच रताळी वेलीची लागवड कशा पद्धतीने केली जाते, याविषयीचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांनीही रताळी लागवड करण्याचा आनंद घेतला.