चाकू हल्ल्यात दगावलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मदत
हुबळी-म्हैसूर विभागातील कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात
बेळगाव : घरातील कर्ता मुलगा गेल्याने निराधार झालेल्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न नैर्त्रुत्य रेल्वे विभागाच्या तिकीट तपासनीसांनी दिला आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे हुबळी व म्हैसूर विभागातील कर्मचाऱ्यांनी तब्बल 4 लाख 50 हजार रुपयांची मदत जमा करून ती ‘त्या’ निराधार कुटुंबाच्या हाती सोपविली असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. दोन महिन्यांपूर्वी लोंढा-खानापूर दरम्यान प्रवास करणारा मूळचा झाशी, उत्तर प्रदेश येथील रेल्वे कर्मचारी देवर्षी वर्मा यांच्यावर एका अज्ञाताने हल्ला केला होता. या हल्ल्यात देवर्षी यांचा मृत्यू झाला. यामुळे वर्मा कुटुंबीय निराधार झाले आहे.
देवर्षी हा रेल्वेमध्ये कंत्राटी कर्मचारी असल्याने कुटुंबाचा मोठा आधार निघून गेला. ही बाब लक्षात घेऊन बेळगावचे तिकीट तपासनीस सुनील आपटेकर तसेच त्यांच्या टीमने त्या कुटुंबाला मदत करण्याचे ठरविले. नैर्त्रुत्य रेल्वेच्या कर्मचारी व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्यांनी वर्मा कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत केवळ हुबळी व म्हैसूर या दोन विभागातून 4 लाख 50 हजार रुपये जमा झाले. अद्याप बेंगळूर विभागाची आर्थिक मदत येणे बाकी आहे. नैर्त्रुत्य रेल्वेचे मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक सत्यप्रकाश शास्त्राr व हुबळी विभागाचे डीआरएम यांच्या उपस्थितीत देवर्षी वर्मा यांच्या आईकडे ही रक्कम देण्यात आली.
Home महत्वाची बातमी चाकू हल्ल्यात दगावलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मदत
चाकू हल्ल्यात दगावलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मदत
हुबळी-म्हैसूर विभागातील कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात बेळगाव : घरातील कर्ता मुलगा गेल्याने निराधार झालेल्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न नैर्त्रुत्य रेल्वे विभागाच्या तिकीट तपासनीसांनी दिला आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे हुबळी व म्हैसूर विभागातील कर्मचाऱ्यांनी तब्बल 4 लाख 50 हजार रुपयांची मदत जमा करून ती ‘त्या’ निराधार कुटुंबाच्या हाती सोपविली असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. दोन महिन्यांपूर्वी […]