भारतीय बास्केटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी फ्लेमिंग

भारतीय बास्केटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी फ्लेमिंग

वृत्तसंस्था/ चेन्नई
भारताच्या राष्ट्रीय पुरुष बास्केटबॉल संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी स्कॉट फ्लेमिंग यांची नियुक्ती करण्यात आली. येथे रविवारी झालेल्या अखिल भारतीय बास्केटबॉल फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
2012 ते 2015 या कालावधीत स्कॉट फ्लेमिंग हे भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. आता त्यांची दुसऱ्यांदा या पदावर नियुक्ती झाली आहे.