पाच देशांच्या निवडणूक प्रतिनिधींची बेळगावला भेट

निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील जाणून घेतली माहिती बेळगाव : भारत जगामध्ये सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. या अनुषंगाने देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पाहण्यासाठी पाच देशांच्या 10 निवडणूक मुख्य प्रतिनिधींनी बेळगावला भेट देऊन निवडणुकीच्या तयारीची पाहणी केली. ही बेळगावसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून […]

पाच देशांच्या निवडणूक प्रतिनिधींची बेळगावला भेट

निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील जाणून घेतली माहिती
बेळगाव : भारत जगामध्ये सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. या अनुषंगाने देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पाहण्यासाठी पाच देशांच्या 10 निवडणूक मुख्य प्रतिनिधींनी बेळगावला भेट देऊन निवडणुकीच्या तयारीची पाहणी केली. ही बेळगावसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. यासाठी 23 देशांतील प्रतिनिधींनी प्रशिक्षणामध्ये भाग घेतला आहे. त्याचाच भाग असणाऱ्या पाच देशांच्या दहा प्रतिनिधींनी बेळगावला भेट देऊन निवडणुकीची माहिती घेतली. कंबोडीयाचे राष्ट्रीय निवडणूक मंडळाचे सदस्य एल. सरात, मुख्य कार्यदर्शी हाऊट बोरींग, मोल्डवा देशाचे केंद्रीय निवडणूक सदस्य डाना मंटेनुवा व अॅन्ड्रयन गमर्ता एसानु, नेपाळ देशातून मुख्य निवडणूक आयुक्त दिनेशकुमार थापालीया व कार्यदर्शी थानेश्वर बुसाल, शिषेल देशातून मुख्य निवडणूक अधिकारी डॅनीसिल्वा लुकास व निवडणूक आयुक्त नोर्लीन निकोलस रोस हौरो, टुनिशिया देशातून निवडणूक हायमशिनर महम्मद तिली व जेलाली नबील या प्रतिनिधींनी भेट देऊन मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. सदर प्रतिनिधी दि. 6 पासून निवडणुकीची माहिती घेत असून दि. 7 रोजी विविध मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रिया कशी चालते, याची माहिती घेणार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सदर विदेशी प्रतिनिधींनी मतदान यंत्रे वितरण प्रक्रियेदरम्यान सेक्टर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांची नेमणूक, प्रशिक्षण, व्हीव्हीपॅट, इव्हीएम, सुरक्षा व्यवस्था आदीबाबतची माहिती दिली.