आ. वैभव नाईकांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

आ. वैभव नाईकांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

कणकवली / प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीसाठी आमदार वैभव नाईक यांनी कुटूंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला. कणकवली शहरातील शिवाजीनगर येथील जि.प. शाळा नंबर ५ येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. यावेळी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आ. वैभव नाईक यांनी व्यक्त केला.यावेळी आ.वैभव नाईक यांच्या आई सुषमा नाईक, पत्नी स्नेहा नाईक, मुलगी नंदिनी नाईक, भाऊ सतीश नाईक, सुशांत नाईक, संकेत नाईक,सेजल नाईक, मयुरी नाईक यांनी मतदान केले.