‘खटाखट’ पैसे मिळविण्यासाठी महिलांची गर्दी

इंडिया’कडून दर महिन्याला 8500 रुपये देण्याचे आश्वासन : काँग्रेस मुख्यालयाबाहेर पोहोचल्या मुस्लीम महिला वृत्तसंस्था/ लखनौ लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वत:च्या घोषणापत्रात गॅरंटी कार्ड जारी करत महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. काँग्रेसला सरकार स्थापन करता येणार नसले तरीही ‘खटाखट’ पैसे मिळविण्यासाठी उत्तरप्रदेश काँग्रेस मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येत महिला गॅरंटी कार्ड घेऊन पोहोचल्या. काँग्रेस नेते […]

‘खटाखट’ पैसे मिळविण्यासाठी महिलांची गर्दी

इंडिया’कडून दर महिन्याला 8500 रुपये देण्याचे आश्वासन : काँग्रेस मुख्यालयाबाहेर पोहोचल्या मुस्लीम महिला
वृत्तसंस्था/ लखनौ
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वत:च्या घोषणापत्रात गॅरंटी कार्ड जारी करत महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. काँग्रेसला सरकार स्थापन करता येणार नसले तरीही ‘खटाखट’ पैसे मिळविण्यासाठी उत्तरप्रदेश काँग्रेस मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येत महिला गॅरंटी कार्ड घेऊन पोहोचल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेक जाहीर सभांमध्ये निवडणुकीनंतर महिलांना ‘खटाखट’ पैसे मिळतील, अशी घोषणा केली होती.
काँग्रेसने स्वत:च्या घोषणापत्रात गॅरंटी कार्ड जारी करत एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हीच रक्कम मिळविण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. काँग्रेस मुख्यालयात प्रवेशापासून आम्हाला रोखले जात असल्याची तक्रार महिलांकडून करण्यात आली. काँग्रेस मुख्यालयाबाहेर मुस्लीम महिलांनीच गर्दी केली होती.
काँग्रेसने निवडणुकीपूर्वी गॅरंटी कार्ड जारी केले होते, यात सरकार स्थापन केल्यावर एक लाख रुपये देण्याचे सांगण्यात आले होते. निवडणुकीपूर्वी मोठ्या संख्येत हे कार्ड लोकांना वाटण्यात आले हेते. बुधवारी सकाळी महिला येथे पोहोचल्यावर कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी काही महिलांकडील कार्डाचा तपशील नोंदवून घेतला, यावर पुढील काळात निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष दिनेश सिंह यांनी म्हटले आहे.
अनेक महिलांनी स्वत:चे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक काँग्रेसकडून प्राप्त गॅरंटी कार्डमध्ये नमूद करत काँग्रेसच्या कार्यालयात जमा केले आहे. या कार्डच्या आधारावरही वर्षाला 1 लाख तर दर महिन्याला 8500 रुपये मिळणार असल्याचे या महिलांचे मानणे आहे. या कार्डमध्ये एक लाख रुपये देण्यासोबत प्रत्येक युवाला कायमस्वरुपी नोकरी देण्याचे आश्वासन आहे. सरकार स्थापन करण्याची स्थिती नसल्याने गॅरंटी कार्डच्या घोषणेवरून जनतेची समजूत कशी काढली जावी असा प्रश्न काँग्रेससमोर उभा ठाकला आहे.