वेबसीरिजमध्ये झळकणार अंकिता

वेबसीरिजमध्ये झळकणार अंकिता

छोट्या पडद्यासोबत चंदेरी पडद्यावर देखील अंकिताने कलाकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अलिकडेच ती अभिनेता रणदीप हुड्डा सोबत स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात दिसून आली होती. अंकिताने आता स्वत:च्या पहिल्या वेबसीरिजची घोषणा केली आहे. या सीरिजमधील अभिनेत्रीचा फर्स्ट लुकही समोर आला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटातील दमदार अभिनयाच्या बळावर अंकिताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अंकिताने आता चित्रपट निर्माता संदीप सिंहसोबत स्वत:ची पहिली वेबसीरिज ‘आम्रपाली’साठी हातमिळवणी केली आहे. या सीरिजचे फर्स्ट लुक पोस्टरही सादर करण्यात आले आहे. यात अंकिता एका वेगळ्या शैलीत दिसून येतेय.
अंकिताने अभिनेत्री कंगना रनौतचा चित्रपट ‘मणिकर्णिका’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती टायगर श्रॉफच्या ‘बागी 3’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली होती. अंकिता आता पहिल्यांदाच वेबसीरिजमध्ये स्वत:ची अभिनयक्षमता दाखवून देणार आहे.