काँग्रेसने दिलेले वचन पाळले

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : सौंदत्ती मतदारसंघात प्रचार बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. गेल्या दहा महिन्यात राज्यातील जनतेसाठी 5 गॅरंटी योजना जारी करून त्यांची समर्पक अंमलबजावणी केली आहे. दिलेले वचन पाळले आहे. आणखी चार वर्षे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे, असा विश्वास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या […]

काँग्रेसने दिलेले वचन पाळले

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : सौंदत्ती मतदारसंघात प्रचार
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. गेल्या दहा महिन्यात राज्यातील जनतेसाठी 5 गॅरंटी योजना जारी करून त्यांची समर्पक अंमलबजावणी केली आहे. दिलेले वचन पाळले आहे. आणखी चार वर्षे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे, असा विश्वास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारासाठी सौंदत्ती विधानसभा मतदारसंघातील शिंदोगी, बंडारहळ्ळी, हिरोरू आणि हळ्ळूर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेमध्ये त्या बोलत होत्या. राज्यातील जनतेने 135 आमदार निवडून देऊन काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत दिले आहे. बेळगाव जिल्हा हा तरुणांचा जिल्हा आहे. तरुणांना उद्योग उपलब्ध करून दिले जातील. मतदारसंघाच्या संपूर्ण विकासाला महत्त्व दिले जाईल. दिलेले वचन पाळले जाईल, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. मृणाल हेब्बाळकर तरुणांचा प्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये आवाज उठवेल. काँग्रेस पक्षाला ज्याप्रमाणे प्रचंड बहुमत देऊन सत्तेत आणले आहे त्या प्रमाणेच मृणाल हेब्बाळकर यांनाही मतदारांनी आशीर्वाद द्यावा. लोकसभा मतदारसंघातील 2 हजार 500 गावांतील समस्या जाणून घेतल्या जातील, असे सांगत सौंदत्ती क्षेत्राशी आपल्या कुटुंबांचे भावनिक संबंध आहेत, असे सांगत मतदारांना साद घातली. यावेळी आमदार विश्वास वैद्य, विधान परिषदेचे आमदार चन्नराज हट्टीहोळी, लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर, डी. डी. टोपोजी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.