चीनचे शि यु की, चेन युफेई विजेते
वृत्तसंस्था/ जकार्ता
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे रविवारी झालेल्या इंडोनेशिया खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत चीनच्या द्वितीय मानांकित शि यु कीने पुरुष एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना डेन्मार्कच्या अँटोनसेनचा पराभव केला. महिला एकेरीत चीनच्या ऑलिम्पिक चॅम्पियन चेन युफेईने विजेतेपद पटकाविले.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात शि यु कीने डेन्मार्कच्या अँटोनसेनचा 21-9, 12-21, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली. 1980 च्या दशकानंतर या स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद मिळविणारा शि यु की हा चीनचा पहिला बॅडमिंटनपटू आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत शि यु की आता सुवर्णपदक मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनची ऑलिम्पिक चॅम्पियन चेन युफेईने दक्षिण कोरियाच्या अॅन सी यंगचा 21-14, 14-21, 21-18 अशा गेम्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. हा अंतिम सामना 82 मिनिटे चालला होता. डेन्मार्कचा ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर अॅक्सेलसनच्या गैरहजेरीत इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा झाली.
Home महत्वाची बातमी चीनचे शि यु की, चेन युफेई विजेते
चीनचे शि यु की, चेन युफेई विजेते
वृत्तसंस्था/ जकार्ता विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे रविवारी झालेल्या इंडोनेशिया खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत चीनच्या द्वितीय मानांकित शि यु कीने पुरुष एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना डेन्मार्कच्या अँटोनसेनचा पराभव केला. महिला एकेरीत चीनच्या ऑलिम्पिक चॅम्पियन चेन युफेईने विजेतेपद पटकाविले. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात शि यु कीने डेन्मार्कच्या अँटोनसेनचा 21-9, 12-21, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली. […]