पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बेळगाव दौऱ्यात बदल

बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात बदल झाला आहे. एप्रिल २८ ऐवजी २७ रोजी बेळगावात येऊन मुक्काम करणार असल्याचे बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी सांगितले. आज भाजप कार्यालयात बोलताना ते म्हणाले कि मोदींच्या कार्यक्रमात बदल झाला आहे. एप्रिल २७ रोजी सकाळी १२ वाजता होणारा स्टेज कार्यक्रम 28 रोजी सकाळी 10 वाजता होणार […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बेळगाव दौऱ्यात बदल

बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात बदल झाला आहे. एप्रिल २८ ऐवजी २७ रोजी बेळगावात येऊन मुक्काम करणार असल्याचे बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी सांगितले. आज भाजप कार्यालयात बोलताना ते म्हणाले कि मोदींच्या कार्यक्रमात बदल झाला आहे. एप्रिल २७ रोजी सकाळी १२ वाजता होणारा स्टेज कार्यक्रम 28 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. पंतप्रधान मोदी २७ रोजी महाराष्ट्रातून बेळगावात दाखल होणार आहेत आणि बेळगावातील एका खासगी हॉटेलमध्ये मुक्काम करतील अशी माहिती देण्यात आली आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, विजयेंद्र आणि इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.