मॅरेथॉन स्पर्धेत चंद्रकांत कडोलकर प्रथम

बेळगाव : जितो अहिंसा रन फॉर पीस यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत चंद्रकांत कडोलकर हिंडलगा यांनी प्रथम क्रमांक पटकावित यश संपादन केले.  जितो अहिंसा रन फॉर पीस यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले गेले होत.s या स्पर्धेत भाग घेऊन 50 वर्षावरील गटात निवृत्त सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन […]

मॅरेथॉन स्पर्धेत चंद्रकांत कडोलकर प्रथम

बेळगाव : जितो अहिंसा रन फॉर पीस यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत चंद्रकांत कडोलकर हिंडलगा यांनी प्रथम क्रमांक पटकावित यश संपादन केले.  जितो अहिंसा रन फॉर पीस यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले गेले होत.s या स्पर्धेत भाग घेऊन 50 वर्षावरील गटात निवृत्त सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन चंद्रकांत कडोलकर प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत विविध गटातीव स्पर्धकानी भाग घेतला होता. या 50 वर्षे वरील गटासाठी पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धा विद्यानिकेतन मराठी शाळा येथून प्रारंभ करण्यात आली शहरातील कांही प्रमुख मार्गावरून पाच किलोमीटर  ही स्पर्धा घेण्यात आली. बक्षिस माजी आमदार संजय बी. पाटील तसेच जिओ अहिंसा क्लबचे पदाधिकारी डॉ. देवेगौडा व मान्यवरांच्या हस्ते चंद्रकांत कडोलकर यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, चषक व बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विजेत्या या यशाबद्दल चंद्रकांत कडोलकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक गोवा व इतर राज्यातून स्पर्धकांनी भाग घेतला होता.