जितोच्या अहिंसा रनला उत्स्फूर्त प्रतिसाद

जितोच्या अहिंसा रनला उत्स्फूर्त प्रतिसाद

2300 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग : स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण
बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) बेळगावतर्फे जितो अहिंसा रन मॅरेथॉनचे रविवारी आयोजन केले होते. यामध्ये 2300 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कॅम्प येथील विद्यानिकेतन शाळेच्या मैदानापासून सुरू झालेल्या मॅरेथॉनमध्ये 3 कि.मी., 5 कि.मी. व 10 कि.मी. अशा शर्यती घेण्यात आल्या. माजी आमदार संजय पाटील, ज्येष्ठ वकील रविराज पाटील, श्री ऑर्थो आणि ट्रॉमा सेंटरचे संचालक डॉ. देवगौडा, ओरियनचे तवनाप्पा पालकर, प्रदीप होसमनी यांच्या हस्ते मॅरेथॉनला चालना देण्यात आली. यामध्ये लहान मुलांसह विद्यार्थी, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण केले. जितोचे अध्यक्ष वीरधवल उपाध्ये यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे- सुरेश बाळेकुंद्री, विनायक जांबोटकर, राधाकृष्ण नायडू, समर्थ हिरेमठ, बाबू चौगुला, अनिश लुक्के, चंद्रकांत कडोलकर, यश गुगरट्टी, महिला-विदुला जैन, शीतल एस. के., निरवी कलाकुप्पी, दिव्या हेरेकर, कीर्ती मल्लापूर, राजश्री बालोजी, स्नेहा हिरोजी यांनी क्रमांक पटकाविले. यावेळी विक्रम जैन, कीर्ती दो•णावर, मयुरा पाटील, दीपक सुभेदार, ममता जैन, अभय आदिमनी उपस्थित होते.