महालक्ष्मी यात्रा शांततेत साजरी करा

आयोजित बैठकीत सीपीआय कल्याणशेट्टी यांचे आवाहन वार्ताहर /सांबरा सांबरा येथे दि. 14 मे पासून श्री महालक्ष्मीदेवीची यात्रा सुरू होत आहे. यात्रा काळामध्ये सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असून यात्रा शांततेत साजरी करावी. तसेच यात्राकाळात कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असे मारीहाळ पोलीस स्थानकाचे सीपीआय गुऊराज कल्याणशेट्टी म्हणाले. गुऊवार […]

महालक्ष्मी यात्रा शांततेत साजरी करा

आयोजित बैठकीत सीपीआय कल्याणशेट्टी यांचे आवाहन
वार्ताहर /सांबरा
सांबरा येथे दि. 14 मे पासून श्री महालक्ष्मीदेवीची यात्रा सुरू होत आहे. यात्रा काळामध्ये सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असून यात्रा शांततेत साजरी करावी. तसेच यात्राकाळात कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असे मारीहाळ पोलीस स्थानकाचे सीपीआय गुऊराज कल्याणशेट्टी म्हणाले. गुऊवार दि.9  रोजी गावातील भैरीदेव चौक येथे आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्या गावामध्ये अठरा वर्षानंतर होणाऱ्या यात्रेमुळे  उत्साहाचे वातावरण आहे. यासाठी सर्वांनी मिळून मिसळून यात्रा करणे गरजेचे आहे. कोणत्याही अडीअडचणी आल्यास पोलिसांशी संपर्क करा. तसेच यात्रा कमिटीने जी नियमावली बनवलेली आहे त्या नियमांचे सर्वांनी पालन करून यात्रा शांततेत साजरी करा. यात्राकाळात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी पार्किंगमध्येच वाहने पार्किंग करा. यासह यात्रेसंबंधित ग्रामस्थांना अनेक सूचना केल्या. प्रारंभी श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचे खजिनदार वाय. के. धर्मोजी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यानंतर सीपीआय गुऊराज कल्याणशेट्टी व पीएसआय मंजुनाथ नाईक यांचा कमिटीच्या वतीने शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. बैठकीस श्री महालक्ष्मी देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई, जि. पं. माजी सदस्य नागेश देसाईसह यात्रा कमिटीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. राजू देसाई यांनी सर्वांचे आभार मानले.