#CarNews #MotorUpdates ‘इर्टिगा’ला चॅलेंज देण्‍यासाठी टोयोटाची नवी कार सज्‍ज : Bharat Live News Media

पुढारी ऑनलाईन डेसक : टोयोटा कंपनी (Toyota Kirloskar Motor India) कमर्शिअल कारसाठी प्रसिद्ध आहे. लवकरच कंपनीची नवीन कार भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. टोयोटाच्या या नव्या कारची (New MPV Car) चर्चा खूप आहे. याचे कारण म्हणजे ही कार इर्टिगा कारची स्पर्धक कार असेल असे मानले जात आहे. या नव्या एमपीव्ही कारमधील फिचर्स आणि किंमतीची चर्चा  … The post ‘इर्टिगा’ला चॅलेंज देण्‍यासाठी टोयोटाची नवी कार सज्‍ज appeared first on पुढारी.
‘इर्टिगा’ला चॅलेंज देण्‍यासाठी टोयोटाची नवी कार सज्‍ज


ऑनलाईन डेसक : टोयोटा कंपनी (Toyota Kirloskar Motor India) कमर्शिअल कारसाठी प्रसिद्ध आहे. लवकरच कंपनीची नवीन कार भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. टोयोटाच्या या नव्या कारची (New MPV Car) चर्चा खूप आहे. याचे कारण म्हणजे ही कार इर्टिगा कारची स्पर्धक कार असेल असे मानले जात आहे. या नव्या एमपीव्ही कारमधील फिचर्स आणि किंमतीची चर्चा  आहे
एर्टिगा कारसोबत स्पर्धेत उतरत असणाऱ्या टोयोटाच्या नव्या कारचे नाव आहे रुमिओन (Rumion). या 7-सीटर कारचे फोटो कंपनीने अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित केले आहेत. यामध्ये दिसणाऱ्या कारचे डिझाईन कारचाहत्यांना आवडत असल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहे. Toyota Rumion ही एमपीवी (MPV) कार आहे.
टोयोटाची सर्वात स्वस्त 7-सीटर कार | lowest price Toyota 7-seater MPV Car
भारतीय बाजारपेठेतील टोयोटाची सर्वात स्वस्त 7-सीटर कार म्हणून रुमिओन सध्या ओळख निर्माण झाली आहे. या कारची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती. टोयोटाची ही नवीन कार मारुती सुझुकीच्या प्रसिद्ध MPV Maruti Ertiga कारवर आधारित मॉडेल असणार आहे. त्यामुळे या कारची चाहते अतुरतेने वाट पाहत आहे.
बुकिंग ‘या’ दिवसापासून होईल सुरु | Booking car will be available from this day
रुमिओन कारची किंमत आणि बुकिंग तपशील देखील लवकरच कंपनीकडून अधिकृतपणे शेअर केला जाईल. टोयोटाच्या या 7 सीटर कारचे मायलेज 26 असेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. या कारमध्ये आकर्षक अशा फिचर्स देखील पहायला मिळणार आहेत. कंपनीने ही कार पेट्रोल इंजिन तसेच निओ ड्राइव्ह (इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर – ISG) तंत्रज्ञान आणि ई-सीएनजी तंत्रज्ञानाने सुसज्ज केली आहे.
रुमिओन कारची किंमत किती असेल? |  Rumion car price?
या कारची किंमत रु. 10.29 लाख एक्स-शोरूम पासून सुरू आहे, तर टॉप एंड व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत रु. 13.68 लाख आहे. रुमिओनचे बुकिंग 11,000 रुपयांच्या टोकन रकमेसह सुरू झाले आहे. या कारचे 8 सप्टेंबरपासून वितरण सुरू होईल अशी चर्चा आहे.  टोयोटा रुमिओन भारतातील परवडणाऱ्या 7-सीटर कार खरेदीदारांची आवडती, पेट्रोल तसेच CNG पर्यायांमध्ये उपलब्ध कार असेल. या कारची मारुती सुझुकी एर्टिगा, Kia Carens आणि Mahindra Bolero Neo तसेच आगामी Citroën C3 एअरक्रॉसशी स्पर्धा करेल.