बेंगळुरातील शाळेला बॉम्बच्या धमकीचा ई-मेल

बेंगळूर : बेंगळूरच्या अमृतहळ्ळी पोलीस स्थानक हद्दीतील एका शाळेला सोमवारी मध्यरात्री बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल आल्याने खळबळ माजली आहे. जैन हेरिटेज स्कूलला ही धमकी देण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 7:30 वाजता कर्मचाऱ्यांनी शाळा उघडल्यानंतर ई-मेल आल्याचे आढळून आले. सोमवारी मध्यरात्री 12:20 वाजता शाळेला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल पाठविण्यात आला. शाळेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर […]

बेंगळुरातील शाळेला बॉम्बच्या धमकीचा ई-मेल

बेंगळूर : बेंगळूरच्या अमृतहळ्ळी पोलीस स्थानक हद्दीतील एका शाळेला सोमवारी मध्यरात्री बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल आल्याने खळबळ माजली आहे. जैन हेरिटेज स्कूलला ही धमकी देण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 7:30 वाजता कर्मचाऱ्यांनी शाळा उघडल्यानंतर ई-मेल आल्याचे आढळून आले. सोमवारी मध्यरात्री 12:20 वाजता शाळेला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल पाठविण्यात आला. शाळेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर तातडीने श्वानपथक, बॉम्बशोध पथकासह पोलीस दाखल झाले. शाळा परिसर व वर्गखोल्यांची तपासणी केल्यानंतर कोठेही स्फोटके आढळली नाहीत. धमकी देणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात येणार आहे. यापूर्वी अनेकवेळा शहरातील प्रतिष्ठीत शाळांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ई-मेल आले होते. तपासणी केल्यानंतर भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने धमकी देण्यात आल्याचे उघडकीस आले होते.